समुद्रातही टिकू देणार नाही ! - पाकला बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यसैनिकांनी दिले आव्हान

क्वेटा (बलुचिस्तान) – कावेबाज पाकिस्तानपासून स्व:चे वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्राणपणाने लढणार्या ‘बलुच लिबरेशन आर्मी’, म्हणजेच बलुच स्वातंत्र्यसैनिकांनी स्वत:चे नौदल उभारले आहे. या संघटनेने त्याच्या पहिल्या समुद्री कारवाईत ३ पाकिस्तानी नौसैनिकांना ठार मारल्याचा दावाही केला आहे.
Balochistan Liberation Army (BLA) has now established a Navy to checkmate Pakistan!
"We won't let you survive even in the sea!" – Freedom fighters of BLA challenge Pakistan.#Baloch #BLA pic.twitter.com/vbQIDuRa4r
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 14, 2026
संघटनेच्या ‘हक्काल’ या माध्यम विभागाकडून एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला असून त्यात मुखवटा घातलेले ४ स्वातंत्र्यसैनिक समुद्राकडे जातांना आणि नंतर ‘स्पीडबोट’मध्ये बसतांना दिसत आहेतत. त्यानंतर ते समुद्रात असलेल्या ‘पाकिस्तान कोस्ट गार्ड’च्या नौकेच्या दिशेने जात असल्याचे दिसत आहे. त्यावर ते अंदाधुंद गोळीबार करत आहेत. त्यात पाक नौदलाचे ३ सैनिक ठार झाले. ही घटना १२ एप्रिलच्या सकाळची असून ग्वादर जिल्ह्यातील जीवानी परिसरातील ‘मिल तियाब’ भागातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
आक्रमणापूर्वी, म्हणजेच व्हिडिओच्या आरंभी ते म्हणत आहेत की, जोपर्यंत या भूमीवर बलुच जिवंत आहे, तोपर्यंत आम्ही तुम्हाला या भूमीवर आणि समुद्रातही टिकू देणार नाही. आम्ही आजही सिद्ध आहोत, कालही होतो आणि पुढेही राहू. तुम्हाला सर्वत्र लक्ष्य केले जाईल.
‘हमाल मेरीटाईम डिफेन्स फोर्स’ या नावाने औपचारिक नौदल शाखा स्थापन !बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचे प्रवक्ते जियंद बलुच यांनी निवेदनात सांगितले की, संघटनेने ‘हमाल मेरीटाईम डिफेन्स फोर्स’ या नावाने औपचारिक नौदल शाखा स्थापन केली आहे. या शाखेचा उद्देश बलुची समुद्राचे संरक्षण करणे आहे. |
US Indians Deportation : अमेरिका १८ सहस्र भारतीय नागरिकांना देशाबाहेर काढणार !
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण