भोपाळ – मध्यप्रदेश सरकार मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम चालू करण्याच्या सिद्धतेत असून त्यावरून वाद निर्माण झाला आहे. हा अभ्यासक्रम सम्राट विक्रमादित्य विद्यापिठामध्ये ‘एम्.बी.ए.’च्या विद्यार्थ्यांसाठी चालू करण्यात येणार आहे. सरकार हा अभ्यासक्रम धार्मिक पर्यटन आणि रोजगार यांच्याशी जोडत आहे; तर विरोधक याविषयी प्रश्न उपस्थित करत आहेत. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री पी.सी. शर्मा यांनी आरोप केला की, सरकार धार्मिक उद्दिष्ट साध्य करत आहे. (देशात लाखो मंदिरे असून त्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा व्यवहार होत असतो. या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे शासनकर्त्यांचे कर्तव्यच आहे. याला धार्मिकतेशी जोडून काँग्रेसच त्याचा ‘मुसलमानांचे लांगूलचालन’ करण्याचा खरा अंजेंडा राबवत आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही ! – संपादक)
Congress Opposes MP government plans to launch a Temple Management course for MBA students at Samrat Vikramaditya University.
Strangely, whenever education or employment is connected to Hindu institutions, Congress objects.
With lakhs of temples handling major economic… pic.twitter.com/aYcd0Rde66
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 14, 2026
१. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री इंदरसिंह परमार यांनी सांगितले की, या अभ्यासक्रमामुळे मंदिरांचे व्यवस्थापन अधिक सक्षम होईल आणि तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
२. उज्जैन येथे मोठ्या प्रमाणावर मंदिरे असल्यामुळे याच ठिकाणाहून या अभ्यासक्रमाला प्रारंभ करण्यात येत आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत मंदिरांचे व्यवस्थापन पारंपरिक पद्धतीने होत होते; मात्र आता वैज्ञानिक आणि व्यावसायिक पद्धतीने मंदिर व्यवस्थापन शिकवले जाईल.
३. विद्यापिठाचे कुलगुरु प्रा. अर्पण भारद्वाज यांनी सांगितले की, जुलैपासून चालू होणार्या या अभ्यासक्रमासाठी अर्ज स्वीकारणे चालू झाले आहे.
४. मध्यप्रदेशात ‘एम्.बी.ए. टेंपल मॅनेजमेंट’ हा अभ्यासक्रम चालू करणारे सम्राट विक्रमादित्य विद्यापीठ हे पहिले विद्यापीठ ठरणार आहे.

हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न