Malda Case : काँग्रेसचे उमेदवार सायम चौधरी यांच्यासह ७ जणांना अटक

मालदा (बंगाल) येथे विशेष सखोल पुनरावलोकन (एस्.आय.आर्.) प्रक्रियेतील कर्मचार्‍यांना बंधक बनवल्याचे प्रकरण !

कोलकाता –  बंगालमधील मालदा येथे विशेष सखोल पुनरावलोकन (एस्.आय.आर्.) प्रक्रियेतील सरकारी कर्मचार्‍यांना बंधक बनवून हिंसा पसरवल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.) मोथाबाडी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सायम चौधरी यांच्यासह ७ जणांना नुकतीच अटक केली. यामध्ये ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’ (आय.एस्.एफ्.)चे ग्रामपंचायत सदस्य गुलाम रब्बानी यांचाही समावेश आहे.

काँग्रेसचे उमेदवार सायम चौधरी आणि त्यांच्या सहकार्‍यांना मोथाबाडी येथे प्रचाराच्या वेळी अटक करण्यात आली. या प्रकरणी यापूर्वी ‘ए.आय.एम्.आय.एम्.’चे ( ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’चे) नेते मोफक्करुल इस्लाम याला बंगाल पोलिसांनी कह्यात घेतले होते. १ एप्रिल २०२६ या दिवशी मालदा येथे ‘एस्.आय.आर्.’ प्रक्रियेसाठी तैनात कर्मचार्‍यांना तृणमूल काँग्रेस आणि इतर काही लोकांनी बंधक बनवून ठेवले होते. या प्रकरणाची नोंद सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून अन्वेषण ‘एन्.आय.ए.’कडे सोपवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

  • अशा आरोपींच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना निवडणूक लढवण्यास बंदी घातली पाहिजे !
  • निवडून येण्यापूर्वीच हिंसा करणारे काँग्रेसचे उमेदवार निवडून आल्यावर काय करतील?, याचा विचारच न केलेला बरा ! अशा पक्षावर बंदी घातली पाहिजे !
  • एरव्ही हातात संविधान घेऊन फिरणारे काँग्रेसचे ‘संविधानरक्षक’ नेते राहुल गांधी सरकारी अधिकार्‍याला बंधक बनवून कायदा हातात घेणार्‍यांना उमेदवारी देतात, हे लक्षात घ्या !