
कर्णावती (गुजरात) – वर्ष २००२ मधील गुजरात दंगलींशी संबंधित एका महत्त्वाच्या प्रकरणात येथील स्थानिक न्यायालयाने ९ हिंदूंना निर्दोष मुक्त केले. या व्यक्तींवर दंगल करणे, अवैधरित्या जमाव जमवणे आणि दगडफेक करणे, असे आरोप होते. न्यायालयाने निर्णयात नमूद केले की, ‘आरोपींवरील आरोप सिद्ध करण्यात पोलीस अपयशी ठरले.’ ९ मे २००२ या दिवशी येथील माधवपुरा परिसरात दगडफेक आणि दंगल केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एकूण ११ हिंदूंविरुद्ध गुन्हा नोंदवला होता.
आरोप असलेल्या ११ व्यक्तींमधील २ जणांचा पूर्वीच मृत्यू झाला होता. न्यायालयात सादर झालेले ४ साक्षीदार २३ वर्षांनंतर आरोपींची ओळख पटवू शकले नाहीत. या परिस्थितीचा विचार करून अतिरिक्त मुख्य न्यायिक दंडाधिकारी डी.जे. परमार यांनी उर्वरित ९ आरोपींना निर्दोष मुक्त केले.
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !