दुर्बिणीने शोधले अब्जावधी वर्षांपूर्वीचे ‘पॉप्युलेशन ३’ तार्यांचे रहस्य

न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकी अंतराळ संस्था ‘नासा’च्या महत्त्वाकांक्षी ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’ या दुर्बिणीला विश्वातील सर्वांत जुने तारे सापडल्याचा अनुमान आहे, अशी माहिती ‘नासा’ने दिली आहे. अनेक संशोधन गटांकडून मिळालेल्या स्वतंत्र दुजोर्यांवर आधारित निष्कर्षांतून पृथ्वीच्या निर्मितीच्या सत्यापर्यंत आपण लवकरच पोचू, अशी आशा वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. ही माहिती ‘स्पेस डेली’ या विश्वविख्यात वृत्त संकेतस्थळाचे लेखक मार्काे मिलानेसी यांनी दिली.
Possibility of uncovering the origin of the Earth soon : Historic discovery by the James Webb Space Telescope (JWST)
Telescope reveals secrets of ancient ‘Population III’ stars dating back billions of years !
JWST is an advanced space observatory developed by NASA. Positioned… pic.twitter.com/rBZyjRkkaf
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 14, 2026
‘जे.डब्ल्यू.एस्.टी.’ दुर्बिण काय आहे ?![]() जे.डब्ल्यू.एस्.टी. म्हणजेच जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप. ही ‘नासा’ची दुर्बिण असून ती पृथ्वीपासून लक्षावधी किमी अंतरावर स्थित आहे. ती विश्वाच्या आरंभाचा शोध घेत आहे. वर्ष २०२१ मध्ये या दुर्बिणीला अंतराळात प्रक्षेपित करण्यात आले होते. |
‘पॉप्युलेशन ३’ या विश्वाच्या आरंभीच्या तार्यांचे रहस्य समजून घ्या !
१. ‘पॉप्युलेशन ३’ नावाचे तारे हे विश्वाच्या आरंभीचे तारे असल्याचे खगोलभौतिकशास्त्रज्ञांनी (‘ॲस्ट्रोफिजिसिस्ट’ यांनी) मान्य केले आहे.
२. गेली अनेक दशके प्रमाणित विश्वशास्त्रीय सिद्धांतानुसार पहिले तारे जवळजवळ शुद्ध हायड्रोजन आणि हेलियम या मूलद्रव्यांपासून बनलेल्या ढगांमधून एकत्र आल्याचे मानले जाते. आतापर्यंत हा केवळ एक सिद्धांत राहिला.
३. विश्वाचा आरंभ ज्या स्फोटापासून झाला, त्यास ‘बिग बँग’ म्हटले जाते. त्या वेळी हायड्रोजन आणि हेलियम ही एकमेव मूलद्रव्ये होती. हे ‘पॉप्युलेशन ३’ तारे उष्णतेने जळाले आणि वेगाने, म्हणजे काही लाखो वर्षांमध्येच नष्ट झाले. त्यांच्या स्फोटक मृत्यूद्वारे त्यांनी विश्वात जड मूलद्रव्यांची पेरणी केली.
४. तथापि चमकतांना विश्वाच्या प्रारंभीच्या या तार्यांना पहाणे आतापर्यंत निरीक्षणाच्या आवाक्याबाहेर होते. ते ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’ या दुर्बिणीद्वारे शक्य झाले आहे. हे तारे अब्जावधी प्रकाशवर्षे दूर आहेत. याचा अर्थ या दुर्बिणीने टिपलेली या तार्यांची छायाचित्रे त्यांच्यातून अब्जावधी वर्षांपूर्वी निघालेला प्रकाश दर्शवते, म्हणजेच विश्वाच्या आरंभीच्या काळातील वातावरण दर्शवते.
हे अतीप्राचीन तारे दुर्बिणीतून कसे काय टिपले गेले ?
हा नवीन पुरावा ‘जीएन्-झेड ११’ नावाच्या आकाशगंगेजवळील एका लहान वस्तूच्या निरीक्षणातून समोर आला आहे. ही दृश्यमान आकाशगंगा विश्वातील सर्वांत दूरच्या निश्चित आकाशगंगांपैकी एक आहे. संशोधक गटांनी त्या वस्तूमधून येणार्या अस्पष्ट उत्सर्जन रेषा शोधून काढल्या. दुर्बिणीतील ‘इंटीग्रल फील्ड युनिट स्पेक्ट्रोग्राफ’चा वापर करून केलेल्या निरीक्षणांनी त्या उत्सर्जन रेषांचे दोन वेगळ्या घटकांमध्ये विभाजन केले. त्यात केवळ अन् केवळ हेलियम आणि हायड्रोजन यांचाच समावेश असल्याचे समोर आले. त्यात कोणतेही जड मूलद्रव्य आढळले नाही.
धातूंची (जड मूलद्रव्यांची) ही अनुपस्थिती हाच महत्त्वाचा तपशील आहे. पहिल्या पिढीनंतरच्या तार्यांच्या प्रत्येक पिढीने पूर्वीच्या तार्यांच्या स्फोटांमध्ये तयार झालेली जड मूलद्रव्ये स्वतःमध्ये सामावून घेतली. अशा प्रकारचे तारे (पॉप्युलेशन ३ तारे) त्यामुळे मानवाला प्रथमच पहायला मिळाले आहेत.
हा निकाल केवळ एका गटाच्या दाव्यापेक्षा अधिक महत्त्वाचा ठरतो; कारण त्याला स्वतंत्र दुजोरा दुसर्या संशोधक गटांकडून मिळाला आहे. एका संशोधक गटाने हेलियम सिग्नल शोधून काढला आणि त्याचे घटक वेगळे केले, तर इतर गटांनी त्याच अवकाशीय स्थानावरून स्वतंत्रपणे हायड्रोजन उत्सर्जन रेषा ओळखल्या.
वेगवेगळ्या विश्लेषणात्मक पद्धती वापरणारे दोन अभ्यास आकाशाच्या त्याच लहानशा भागावर लक्ष केंद्रित करून तेच धातूविरहित संकेत शोधत आहेत. हे एकत्रीकरण आतापर्यंतचा सर्वांत स्पष्ट पुरावा आहे की, ‘पॉप्युलेशन ३’ तारे मुळात अस्तित्वात होते. अब्जावधी प्रकाशवर्षे दूर असलेल्या वस्तूंमधून येणार्या अस्पष्ट उत्सर्जन रेषांचे विश्लेषण करून स्वतंत्र निष्कर्ष एकाच दिशेकडे अंगुलीनिर्देश करत असणे, हे ऐतिहासिक आहे. आज ती दुर्बिण अशा गोष्टी पाहू शकत आहे, जेव्हा विश्वाचे वय केवळ काही लाख वर्षे होते.

‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य