‘श्रीमती क्षमा राणे या काही सेवेनिमित्त देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात येतात. मी देवद आश्रमात पूर्णवेळ साधनारत असतांना मला राणेकाकूंकडून काही सेवा शिकण्याची संधी मिळाली. त्या वेळी काकूंच्या सहवासात असतांना माझ्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. सेवेची तळमळ
‘राणेकाकू पुष्कळ तळमळीने सेवा करतात. त्यांची रात्री कितीही वेळ जागून अथवा पहाटे लवकर उठून सेवा करण्याची तयारी असते. ‘रात्री उशिरापर्यंत सेवा केली; म्हणून सकाळी सेवेला विलंबाने आरंभ केला आहे’, असे काकूंचे कधीच नसते.

२. परिस्थिती स्वीकारणे
काही वेळा आम्हाला सेवा करण्यासाठी जागा न्यून पडत असे. सेवेच्या ठिकाणी एखादी सुविधा उपलब्ध नसल्यास काकूंचे या विषयी कधीच गार्हाणे नसायचे. काकूंचे लक्ष केवळ सेवेकडेच असायचे.
३. ‘तरुणांनाही लाजवेल’, अशी सेवा करण्याची तयारी असणे
काकूंचे वय अधिक असूनही त्या सेवा करतांना कधीच थकत नाहीत. काकूंचा सेवेचा उत्साह जसा सकाळी असतो, तसाच तो रात्रीपर्यंत टिकून रहातो. ‘तरुणांनाही लाजवेल’, अशी सेवा काकू करतात.
४. दायित्व घेऊन सेवा करणे
काकू देवद आश्रमात काही दिवसच सेवेला येतात. देवद आश्रमातील सेवांचे उत्तरदायित्व त्यांचे नसले, तरीही त्या ‘प्रत्येक सेवा माझीच आहे’, या भावाने करतात. त्या प्रत्येक सेवेत स्वतः लक्ष घालून सहसाधकांकडून सेवा करून घेतात अथवा स्वतः करतात. त्या सेवेचा आढावा घेऊन त्याच्या नोंदीही ठेवतात.
५. वेळेचे योग्य नियोजन करून फलनिष्पत्ती चांगली होण्यासाठी सतर्क असणे
काही वेळा काकूंचे दिवसभरातील वेळेचे योग्य नियोजन झाले नाही, तर काकू अस्वस्थ होत असत. ‘वेळेचे योग्य नियोजन होऊन सेवेची फलनिष्पत्ती चांगली असायला हवी’, अशी काकूंची तळमळ असते आणि त्याविषयी त्या सतर्क असतात.
६. व्यापकता
काकू रामनाथी आश्रमात पूर्णवेळ सेवारत असल्या, तरीही त्या सनातनच्या सर्व आश्रमांचा विचार करतात. ‘एखादी गोष्ट त्यांनी रामनाथी आश्रमातील साधकांसाठी केली, तर ती इतर आश्रमांतील साधकांसाठी व्हावी’, यासाठी त्यांची धडपड असते. रामनाथी आश्रमातील खोल्यातील खिडक्यांना जसे पडदे शिवले, तसेच पडदे त्यांनी इतर आश्रमांसाठीही शिवून पाठवले. खरेतर रामनाथी आश्रमात पडदे शिवणार्या साधकांची संख्या अल्प आहे. असे असतांना इतर आश्रमांसाठी पडदे शिवून देणे कठीण आहे; मात्र काकूंच्या तळमळीमुळे त्यांनी ती सेवाही पूर्ण केली.
‘हे गुरुदेवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), राणेकाकूंप्रमाणेच सेवेची तळमळ माझ्यातही निर्माण होऊ द्या’, हीच आपल्या चरणी प्रार्थना करते. ‘काकूंचे गुणही आपणच लिहून घेतलेत’, त्याबद्दल आपल्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. लक्ष्मी नारायण पाटील (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ३६ वर्षे), बेळगाव (५.३.२०२६)
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
साधनेतील ‘स्वीकारणे’ या गुणाचे अनन्यसाधारण महत्त्व !
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
अध्यात्म शिकण्यापेक्षा प्रत्यक्ष साधना करणे महत्त्वाचे !