Haryana ‘Love Jihad’ :  सैन्यदलात मेजर असल्याचे सांगून हिंदु तरुणींना फसवणार्‍या जिहाद्याला अटक !

हरियाणामध्ये ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उजेडात

कैथल (हरियाणा) – सैन्यदलात मेजर असल्याचे खोटेच सांगून हिंदु मुलींना लग्नाच्या जाळ्यात फसवणार्‍या एका जिहाद्याला कैथल पोलिसांनी नुकतीच अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मुसलमान जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्याचा रहिवासी आहे. त्याच्याकडून सैन्यदलाचा गणवेशही जप्त करण्यात आला आहे. आरोपी तरुण विवाह जुळवणार्‍या ऑनलाईन संकेतस्थळावर स्वतःची ओळख सैन्यदलातील मेजर निशांत सहारन अशी करून देऊन हिंदु तरुणींना फसवत होता. अशाच एका फसवणुकीच्या प्रकरणात हिसारमधील एका हिंदु तरुणीला भेटायला जात असतांना कैथल पोलिसांनी त्याची टॅक्सी अडवून चौकशी केली. ‘आरोपी तरुण मेजर असल्याचे खोटेच सांगत आहे’, हे पोलिसांच्या लक्षाआले. आरोपी तरुण निशांत सहारन नसून मेहराजुद्दीन आझम असल्याचे चौकशीतून समोर आले. हिसारमधील हिंदु तरुणीला लग्नाच्या जाळ्यात अडकवण्याचा त्याचा डाव पोलिसांच्या लक्षात आला. कैथल पोलिसांनी हे प्रकरण हिसारशी संबंधित असल्याने आरोपीला तेथील पोलिसांच्या कह्यात दिले.

१. हिसार पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. आतापर्यंत त्याने १० पेक्षा अधिक हिंदु तरुणींना मेजर असल्याचे खोटे सांगून फसवल्याचे उघड झाले. हिसारमधील एका हिंदु तरुणीकडून त्याने ३० सहस्र रुपयेही लुटले होते.

२. मेहराजुद्दीन आझम याने बनावट मेजर बनून निशांत सहारन असे हिंदु नाव धारण केले होते. आरोपी मेहराजुद्दीन आझम याच्या विरोधात हिसारच्या आझाद नगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे.

३. हिसार पोलिसांनी केलेल्या चौकशीत मेहराजुद्दीनने सांगितले की, त्याने ‘शादी डॉट कॉम’वर बनावट ओळखपत्र सिद्ध केले होते. त्यात त्याने स्वतःचे नाव निशांत सहारन आणि व्यवसाय ‘आर्मी मेजर’ असे सांगितले होते. त्याने १२० एकर भूमीचा मालक असल्याचे सांगितले होते. गणवेशातील काही छायाचित्रेही त्याने या संकेतस्थळावर प्रसारित केली होती.

४. आरोपीवर धर्म लपवून आणि लग्नाचे आमीष दाखवून हिंदु तरुणींकडून पैसे लुटल्याचा आरोप आहे. सध्या हिसार पोलीस या प्रकरणी अन्वेषण करत आहेत. त्याच्यासह या गुन्ह्यात कोण-कोण सामील आहे, याचा शोध घेतला जात आहे.