संतप्त स्थानिकांनी तेल टँकर, ट्रक जाळले, तसेच पोलीस चौकीची तोडफोड
इंफाळ (मणीपूर) – काही आतंकवाद्यांनी बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांग ट्रोंगलाओबी येथे एका घरावर फेकलेल्या बाँबच्या स्फोटात ५ वर्षांचा मुलगा आणि ६ महिन्यांची मुलगी यांचा मृत्यू झाला, तर त्यांची आई घायाळ झाली. या घटनेच्या निषेधार्थ स्थानिकांनी येथे हिंसक आंदोलन केले. त्यांनी एका पेट्रोल पंपाजवळील तेलाचे २ टँकर आणि एक ट्रक यांना आग लावली. तसेच मोइरांग पोलीस ठाण्यासमोर टायर जाळले आणि एका पोलीस चौकीची तोडफोड केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी परिसरात सुरक्षादल तैनात करण्यात आले आहे.

स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक