जयगड समुद्रात मत्स्यव्यवसाय विभागाची आणखी एक कारवाई

रत्नागिरी – तालुक्यातील जयगड समुद्रात एकाच वेळी प्रकाशझोतात (एलईडी) मासेमारी करणार्या ३ नौका मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने ३० मार्च या दिवशी पकडल्या होत्या. आता याच पथकाने प्रकाशझोतात मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाणारी आणखी एक नौका पकडली आहे. ‘भराडी प्रसन्न’ असे या मासेमारी करणार्या नौकेचे नाव असून ती भगवती बंदर येथील कैलास उल्हास कुबल यांच्या मालकीची आहे.
१. साहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागाचे गस्तीपथक ‘शारदा’ गस्ती नौकेने समुद्रात गस्त घालत होते. यामध्ये परवाना अधिकारी स्मितल कांबळे, सुरक्षारक्षक सुजल पोवार, अमोल पिलणकर आणि अन्य साथीदार होते.
२. शनिवारी, ५ एप्रिलला गस्ती नौका जयगड समुद्रात आली असतांना राज्याच्या अधिकार क्षेत्रातील म्हणजेच साडेबारा नॉटीकल मैल समुद्र अंतराच्या आत ‘भराडी प्रसन्न’ नौका प्रकाशझोताची व्यवस्था करून ठेवलेल्या स्थितीत दिसून आली.
३. ५ खलाशांना घेवून ही नौका समुद्रात जाण्याच्या सिद्धतेत असतांनाच कारवाई करण्यात आली. गस्ती पथकाने पकडलेली ही नौका मिरकरवाडा बंदरात आणण्यात आली आहे.
४. नौकेवरील एलईडी लाईट, जनरेटर जप्त करण्यात आले असून नौका मालकावर महाराष्ट्र सागरी नियमन अधिनियम अध्यादेश २०२१ अन्वये साहाय्य्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त तथा अभिनिर्णय अधिकारी सागर कुवेस्कर यांच्या न्यायालयात प्रतिवेदन प्रविष्ट करण्यात येणार आहे.
५. सुधारित अधिनियमानुसार प्रकाशझोतात मासेमारी करणार्या नौका मालकावर ५ लाख रुपयांपर्यंतचा दंड करण्याचे प्रावधान आहे.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !