Anti-Encroachment Drive : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे ५२ अतिक्रमणे हटवली !

  • अतिक्रमण हटवण्यास विरोध करणार्‍या ‘ए.आय.एम्.आय.एम्.’चे आमदार रहमत बेगवर गुन्हा नोंद !

  • साहिल अकबर याला अटक !

(‘ए.आय.एम्.आय.एम्.’ म्हणजे ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन – अखिल भारतीय मुस्लिम एकता संघ)

भाग्यनगर (तेलंगाणा) – ५ एप्रिल २०२६ या दिवशी येथील चारमिनार विभागात ‘ग्रेटर हैदराबाद म्युनिसिपल कॉरपोरेशन’च्या पथकाने ‘लाड बाजार ते पुरानापुल रस्ता’ येथील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम राबवली. या कारवाईत अतिक्रमण करून उभारण्यात आलेली एकूण ५२ बांधकामे हटवण्यात आली. चारमिनार विभागात अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला ‘ए.आय.एम्.आय.एम्.’च्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला. या प्रकरणी ‘ए.आय.एम्.आय.एम्.’चे आमदार रहमत बेग यांच्यासह अनेकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी माजी नगरसेवकाचा मुलगा साहिल अकबर याला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. (कायद्याचे रक्षक नव्हे, भक्षक बनलेले  ‘ए.आय.एम्.आय.एम्.’चे लोकप्रतिनिधी ! – संपादक)

१. चारमिनार पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचार्‍याने आरोपींच्या विरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती.

२. अतिक्रमणे हटवण्याच्या मोहिमेत सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांना काम करण्यापासून रोखणे आणि त्यांच्याशी गैरवर्तन करणे इत्यादी आरोप या तक्रारीत करण्यात आले होते.

३. या घटनेत एक पोलीस कर्मचारी घायाळ झाला आहे. सध्या परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

४. शासकीय कामात अडथळा निर्माण करणार्‍यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

संपादकीय भूमिका

अवैध बांधकांना विरोध करण्याऐवजी ती हटवण्याचा विरोध करणारे ‘ए.आय.एम्.आय.एम्.’चे जनताद्रोही आमदार !