‘सौ. वैशाली राजहंस (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ६९ वर्षे) या ४ वर्षांपासून माझ्या व्यष्टी साधनेचा आढावा घेत होत्या. त्या घेत असलेल्या आढाव्याचा मला पुष्कळ लाभ झाला. माझ्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. वात्सल्यभाव
‘सौ. राजहंसकाकूंमध्ये वात्सल्यभाव पुष्कळ आहे. त्या आमचा व्यष्टी साधनेचा आढावा आईच्या प्रेमाने घेत असत. काकूंचे बोलणे मृदु आणि प्रेमळ असायचे. मला त्यांच्या बोलण्यात कधीही आग्रह जाणवला नाही.

२. योग्य दृष्टीकोन दिल्याने साधकांना सूत्रे सहजतेने ग्रहण करता येणे
काकू आढाव्यात मार्गदर्शन करत असतांना साधकांनी सांगितलेल्या सूत्रांविषयी मुद्देसूद आणि स्पष्ट बोलत असत. त्यामुळे आम्हाला त्यांनी सांगितलेली सूत्रे सहजतेने ग्रहण करता येत असत. आमची चूक किंवा स्वभावदोष आणि अहं लक्षात आल्यावर त्या आम्हाला त्याविषयी मोकळेपणाने सांगत असत. त्यामुळे साधकही काकूंशी मनमोकळेपणाने बोलत असत. त्या आम्हाला योग्य दृष्टीकोन देऊन मार्गदर्शन करत असत.
३. इतरांना समजून घेणे
आम्ही काही वयस्कर साधक काकूंच्या आढाव्यात मार्गदर्शन घेत होतो, तरीही आम्हाला आढाव्याचा कधीही ताण आला नाही. काकू समोरच्या साधकांची क्षमता ओळखून ‘त्यांनी साधनेचे कुठले प्रयत्न करायचे ?’ हे सांगत असत. ‘साधक देत असलेली स्वयंसूचना सत्रे भावपूर्ण आणि परिणामकारक व्हायला हवीत’, यावर त्यांचा भर असायचा.
४. आध्यात्मिक स्तरावर आणि भावाच्या स्तरावर मार्गदर्शन करणे
मी आढाव्यात काकूंना ‘माझे स्वभावदोष आणि अहं ज्या प्रसंगांत उफाळून येत असत, असे प्रसंग सांगून त्यावर मात कशी करायची ?’, याविषयी विचारत असे. त्या वेळी त्या मला मानसिक किंवा भावनिक स्तरावर न हाताळता आध्यात्मिक स्तरावर दृष्टीकोन देत असत. त्या त्यांच्या खोलीत असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र दाखवून ‘‘आपले नाते केवळ गुरुदेव आणि श्रीकृष्ण यांच्याशी आहे’’, हे माझ्या मनावर बिंबवत असत.
त्या मला स्वतःच्या आयुष्यात घडलेले काही प्रसंग उदाहरण म्हणून सांगायच्या. त्यामुळे माझ्यात आणि त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. ‘कठीण प्रसंगांत देवाशी नाते जोडून कशी मात करायची ?’,हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले.
काकूंमधील या सर्व गुणांमुळे काकू घेत असलेला व्यष्टी साधनेचा आढावा, म्हणजे माझ्यासाठी गुरुदेवांचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) सत्संगच होता. मी आढाव्याच्या दिवसाची आतुरतेने वाट पहायचे; कारण आढाव्यात माझी भावजागृती होत असे. आढावा संपल्यावरही पुढचे काही दिवस माझी ही भावावस्था टिकून असायची.
‘हे श्रीकृष्णा, राजहंसकाकूंच्या माध्यमातून तूच मला मार्गदर्शन केलेस. त्याचा मला लाभ घेता येऊन माझी पुढची साधनाही तूच माझ्याकडून करून घे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे. ‘सौ. राजहंसकाकूंच्या समवेत माझे एक वेगळेच आध्यात्मिक नाते तू निर्माण केलेस’, त्याबद्दल तुझ्या चरणी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. देवी कापडिया (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ७३ वर्षे), फोडा, गोवा. (२७.३.२०२६)
लक्षात घ्या साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व !
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !