अमली पदार्थाच्या अतीसेवनाने मृत्यू झाल्याचा संशय : पर्यटन क्षेत्राला गालबोट

पणजी, ४ एप्रिल (वार्ता.) – हणजूण येथे ३ एप्रिलच्या रात्री उशिरा आयोजित केलेल्या एका पार्टीमध्ये इंदूर (मध्यप्रदेश) येथील २१ वर्षांच्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. प्राथमिक अन्वेषणात अमली पदार्थाच्या अतीसेवनाने हा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
उपलब्ध माहितीनुसार मृत युवक त्याच्या मित्रांसमवेत सुटीचा आनंद घेण्यासाठी गोव्यात आला होता. हणजूण येथे एका प्रसिद्ध ठिकाणी पार्टी चालू असतांना अचानक त्याची तब्येत खालावली आणि तो बेशुद्ध पडला. तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला मित्रांनी जवळच्या एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ नेले; मात्र तरुणाची गंभीर अवस्था पाहून त्याला भरती करण्यास खासगी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने नकार दर्शवला आणि त्याला दुसर्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. अन्य २ खासगी रुग्णालयांमध्येही असाच प्रसंग घडला. उपचारासाठी एका रुग्णालयातून दुसर्या रुग्णालयात नेण्यामध्ये उपचारासाठीचा महत्त्वाचा वेळ वाया गेला. शेवटी तरुणाला म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. तरुणाचा मृत्यू कशामुळे झाला ? याचे गूढ अद्याप कायम आहे; मात्र अमली पदार्थाच्या अतीसेवनामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी मृतदेह कह्यात घेऊन तो उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पाठवला आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे, असे अन्वेषण अधिकार्यांनी सांगितले. हणजूण पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे राज्यातील क्लब संस्कृती आणि अमली पदार्थांचा व्यवहार या प्रश्नावर पुन्हा एका गंभीर चर्चा चालू झाली आहे.
घटनेवर राजकीय क्षेत्रात संतप्त प्रतिक्रिया
…तर अमली पदार्थांचा स्रोत शोधा ! – आमदार मायकल लोबो
घटनेनंतर मी संबंधित पोलीस निरीक्षकांशी संपर्क करून घटनेचे सखोल अन्वेषण करण्याची सूचना केली आहे. युवकाचा मृत्यू जर अमली पदार्थाच्या अतीसेवनाने झालेला असेल, तर अमली पदार्थाचा स्रोत शोधून काढला पाहिजे. गोव्यात आम्हाला चांगल्या दर्जाचे पर्यटक पाहिजेत, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार मायकल लोबो यांनी व्यक्त केली आहे.
गोव्यासाठी ‘क्लब’ धोरण लागू करा ! – डिलायला लोबो
गोव्यात बहुतेक उपाहारगृहांचे ‘क्लबां’मध्ये रूपांतर झालेले आहे. उपाहारगृहासाठी अनुमती घेऊन ‘क्लब’ चालवले जात आहेत; मात्र परराज्यांमध्ये ‘क्लब’साठी निराळे धोरण आहे आणि त्याचे कठोरतेने पालन केले जाते. गोव्यातही असे धोरण राबवणे अत्यावश्यक आहे, अशी प्रतिक्रया भाजपच्या शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांनी व्यक्त केली आहे.
शवविच्छेदन अहवाल सार्वजनिक करा ! – काँग्रेस
युवकाचा हणजूण येथील पार्टीमध्ये मृत्यू होणे, हे गोव्यातील अमली पदार्थविरोधी पथकाचे अपयश आहे. या प्रकरणी पूर्ण पारदर्शकता बाळगून युवकाचा शवविच्छेदन अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.
काँग्रेसचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनीही गोव्यात अमली पदार्थ सर्वत्र फोफावला असल्याचा आरोप केला.
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात
‘म्युझिक कॉन्सर्ट’मध्ये यापुढे दारूला अनुमती नाही ! – योगेश कदम, गृहराज्यमंत्री
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक