‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ आणि ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ यांच्या वतीने दावोस (स्वित्झर्लंड ) येथील ‘हाऊस ऑफ पायोनियर्स’मध्ये ‘भारतीय ज्ञानप्रणाली’ या विषयावर शोधनिबंध सादर !

फोंडा (गोवा) – दावोस, स्वित्झर्लंड येथे ‘हाऊस ऑफ पायोनियर्स’मध्ये एक जागतिक परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे प्रतिनिधी सहभागी झाले होते. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला आरोग्य, चैतन्य आणि मानवी कल्याण यांच्या सर्वांगीण (म्हणजे केवळ शारीरिक नाही, तर मानसिक अन् आध्यात्मिक स्तरांवरील) दृष्टीकोनावर स्वतःचे विचार मांडण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
‘हाऊस ऑफ पायोनियर्स’च्या ‘वर्ल्ड सिस्टमिक फोरम’मध्ये ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने श्री. शॉन क्लार्क (संशोधन गटाचे सदस्य आणि आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) आणि सौ. श्वेता क्लार्क यांनी समकालीन जागतिक आव्हानांच्या दृष्टीने ‘प्राचीन भारतीय ज्ञानप्रणालींचे महत्त्व’, या विषयावरील शोधनिबंध सादर केले. त्यांनी या विषयावरील आध्यात्मिक संशोधनावर आधारित ३ प्रमुख सूत्रे या परिषदेत मांडली.

१. वैद्यकीय उपचारांमध्ये आध्यात्मिक परिमाणांचा समावेश करण्याची आवश्यकता !
आधुनिक वैद्यकशास्त्र एखाद्या रोगाचा प्रतिबंध, निदान आणि उपचार करतांना त्यामागे असलेली आध्यात्मिक कारणमीमांसा लक्षात घेत नाही. या अत्यंत सूक्ष्म; परंतु मूलभूत सूत्राकडे दुर्लक्ष केल्यामुळे वैद्यकीय उपचार परिपूर्ण न होता अपूर्ण रहातात.
२. दैवी कण
दैवी कण म्हणजे ‘सूक्ष्मतम सकारात्मक ऊर्जेचे स्थूल रूप’ होय. या सूत्राला विज्ञान आणि तत्त्वज्ञान या विषयांतील तज्ञांकडून पुष्कळ सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या वेळी उपस्थितांना दैवी कण दाखवण्यात आले. दैवी कणांविषयी उपस्थितांनी पुष्कळ जिज्ञासा दाखवली आणि प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतले.

३. आध्यात्मिक स्तरावर व्यक्तीची चेतना शक्ती कार्य कशी करते ?
आजचे आधुनिक विज्ञान केवळ मेंदूच्या हालचाली, चेतापेशी आणि मज्जासंस्थेतील आवेग यांचा अभ्यास करते; परंतु ही संशोधन पद्धत अत्यंत मर्यादित आहे. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी याविषयी केलेल्या संशोधनानुसार ‘व्यक्तीच्या मनातील बहुतांश विचार, अनुभव आणि निर्णय घेण्याची प्रकिया ही मेंदूपेक्षा तिच्या अतिसूक्ष्म अशा अंतर्मनावर अवलंबून असते.’ हा निष्कर्ष भारतीय ज्ञानप्रणालींवर आधारित आहे. भारतीय ज्ञानप्रणालीनुसार मानवी अनुभव आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया प्रामुख्याने सुप्त मनात घडते, जी अत्यंत सूक्ष्म आहे. जेव्हा आपण केवळ मेंदूचा विचार करतो, तेव्हा आपला दृष्टीकोन संकुचित होतो; मात्र जेव्हा आपण आध्यात्मिक स्तरावर सुप्त मनाचा अभ्यास करतो, तेव्हा मानवी वर्तन आणि जाणीव समजून घेण्याच्या स्वतःच्या सीमा अधिक व्यापक अन् समृद्ध होतात.
या सत्रांच्या कालावधीत ‘प्राचीन भारतीय ज्ञानप्रणाली ही व्यक्तीचे आरोग्य, मानवी चेतना, शाश्वत जीवनशैली आणि विकास यांसाठी मोलाचे योगदान कसे देऊ शकते ?’, याविषयी आंतरराष्ट्रीय समुदायाने पुष्कळ जिज्ञासा आणि रस दर्शवला.
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
यांसाठी मंदिरांचे सरकारीकरण नको !
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
कलेच्या माध्यमातून समाजापर्यंत साधना पोचवण्यासाठी करायच्या समष्टी सत्सेवेची माध्यमे !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य