प्रार्थितो आम्ही श्री हनुमंताला ।

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ग्रंथांच्या संदर्भातील सेवा करतांना मला पुढील कविता सुचली.

हृदयी भक्ती, बाहूंत शक्ती ।
तीक्ष्ण बुद्धी, अतुलनीय गती ।। १ ।।

अमोघ वाणी, गुणांच्या खाणी ।
सर्वश्री (टीप १) असूनही नम्रतेत जो शिरोमणी ।। २ ।।

श्री. रूपेश रेडकर

श्रीरामाच्या त्या आदर्श सेवकाला ।
प्रार्थितो आम्ही श्री हनुमंताला ।। ३ ।।

संदेश श्री गुरुदेवांचा (टीप २)।
विचार सनातन हिंदु राष्ट्राचा ।। ४ ।।

जनमानसात शीघ्रातिशीघ्र पोचवायला ।
साधनामार्ग ग्रंथसेवेचा (टीप ३) लाभला ।। ५ ।।

त्या मार्गावरून चालायला ।
शक्ती-बुद्धी-भक्ती द्यावी आम्हाला ।। ६ ।।

साधनेने सुगंधी होऊन ही जीवनरूपी पुष्पमाला ।
अर्पण व्हावी अमुच्या श्रीरामाला ।। ७ ।।

टीप १ – शक्ती, सिद्धी इत्यादी दैवी संपन्नता

टीप २ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा

टीप ३ – सनातनच्या ग्रंथांच्या संकलनाची सेवा’

– श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, देवद, पनवेल. (३०.३.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक