राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचा जळफळाट !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही चालूच आहे. आपले शेजारी सध्या अशा स्थितीत आहेत की, ते काहीतरी आगळीक करू शकतात. त्यांनी असे केल्यास भारताकडून जोरदार आणि तीव्र स्वरूपाचे उत्तर दिले जाईल, अशी चेतावणी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आखाती देशांतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दिल्यानंतर त्यावर पाकने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी ‘पाकिस्तान निर्णायक प्रत्युत्तरासाठी सिद्ध आहे’, असे म्हटले आहे.
ख्वाजा आसिफ म्हणाले की, पहलगाम येथील आक्रमणाची वर्षपूर्ती जवळ येत असतांना अशा प्रकारे केली जाणारी वक्तव्ये ही शक्ती नाही, तर चिंता दर्शवतात. अशा प्रकारची धमकी देणे नवीन नाही. निराधार आरोपांच्या आडून राजकीय स्वार्थासाठी तणाव वाढवण्याचा प्रयत्न करणे हा एका अपेक्षित पद्धतीचा भाग आहे; पण पाकिस्तान शांतता आणि प्रादेशिक स्थैर्य यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister