|

फोंडा, २ एप्रिल (वार्ता.) – फोंडा मतदारसंघातील विधानसभा पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाचे उमेदवार गितेश नाईक यांना ५ लाख रुपयांचा धनादेश न वटल्याच्या प्रकरणी न्यायालयाने समन्स पाठवूनही ते उपस्थित न राहिल्याने मेरशी येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे.
तक्रारदार श्यामसुंदर मिरजकर यांनी गितेश नाईक यांच्या विरोधात तक्रार केली होती. मिरजकर यांच्या दाव्यानुसार एका कायदेशीर प्रक्रियेच्या वेळी गितेश नाईक यांनी त्यांना ५ लाख रुपयांचा धनादेश दिला होता, जो बँकेत दिल्यावर वटला नाही. या प्रकरणी न्यायालयात खटला चालू झाल्यानंतर नाईक यांनी नियमितपणे न्यायालयात उपस्थिती लावली नव्हती. ३० मार्चला झालेल्या सुनावणीच्या वेळी गितेश नाईक आणि त्यांचे अधिवक्ता न्यायालयात उपस्थित नव्हते. मिरजकर यांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार १८ मार्च २०२४ या दिवशी गितेश नाईक यांच्या विरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले होते. त्यानंतर पुढील सर्व दिनाकांना उपस्थित रहाण्याच्या अटीवर ते रहित करण्यात आले.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !