अनधिकृत ‘रिसॉर्ट’चा ग्रामस्थांना होत होता त्रास !
(‘रिसॉर्ट’ म्हणजे विश्रांती, सुट्टी आणि मनोरंजन यांसाठी केलेले विशेष ठिकाण)

कुंभारवाडी-कडाव (जिल्हा रायगड) – कर्जत येथील ग्रामपंचायत परिसरात अवैधरित्या चालू असलेले रिसॉर्ट ८ दिवसांत बंद करण्याची सूचना आणि आवश्यक त्या अनुमती प्रविष्ट करण्याचे आदेश कडाव ग्रामपंचायतीकडून मालकाला देण्यात आले आहेत.
हे ‘रिसॉर्ट’ रात्री उशिरापर्यंत चालू असल्याने तेथील ‘डीजे’च्या कर्णकर्कश आवाजामुळे लहान मुले आजारी पडत आहेत; तसेच आजारी माणसांना पुष्कळ त्रास होत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासही मोठा अडथळा होत आहे. तिथे येणार्या पर्यटकांचे मद्यप्राशन आणि दंगा यांमुळे गावाची शांतता भंग होत आहे. याविषयी ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या. अंतिमतः ग्रामपंचायतीने ते बंद करण्याचे आदेश काढले.
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !