
सावंतवाडी – सावंतवाडी शहर आणि परिसर, वैभववाडी आणि दोडामार्ग तालुका येथे २ एप्रिलच्या सायंकाळी पाऊस पडला. प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते; मात्र सायंकाळी पाऊस पडल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला. अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिक, वाहनचालक, तसेच व्यापारी यांची तारांबळ उडाली. यावर्षी आंबा आणि काजू या पिकांच्या हंगामाच्या प्रारंभी पालटलेल्या वातावरणाचा या पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. शेतकर्याची मोठी हानी झाली आहे. असे असतांना पुन्हा अवेळी पडलेल्या पावसामुळे उर्वरित पिकही हातून जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
आदिवासींच्या घरांच्या बांधकामाला मुसलमानांचा विरोध : पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर काम चालू