
‘अध्यात्मात सेवकभावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हनुमानाने युगानुयुगे दास्यभक्तीचा सर्वाेत्कृष्ट आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. तो आपल्या प्रभुकरता (श्रीरामाकरता) प्राण अर्पण करण्यासाठी सदैव सिद्ध असायचा. श्रीरामाच्या सेवेपुढे त्याला सर्वकाही कवडीमोल वाटायचे.
सर्व साधकांनी स्वतःत हनुमानाप्रमाणे सेवकभाव (दास्यभाव) निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यामुळे त्यांच्यात नम्रता, लीनता, गुरुनिष्ठा, गुरूंचे मन जिंकण्याची आंतरिक तळमळ आदी गुण वृद्धींगत होऊन अहंचे निर्मूलन होऊ लागेल आणि साधकांसाठी ईश्वरप्राप्तीचा मार्ग सुकर होईल !
‘साधकांच्या जीवनाचे प्राधान्य हे केवळ ‘भगवंत आणि त्याची भक्ती करणे’, एवढेच असायला हवे !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
साधकहो, प्रभु श्रीरामचंद्रांच्या रामराज्य स्थापनेच्या कार्याशी पूर्णतः एकरूप झालेल्या हनुमंताचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवा आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात स्वतःला समर्पित करा !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.३.२०२६)
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
साधनेतील ‘स्वीकारणे’ या गुणाचे अनन्यसाधारण महत्त्व !
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।