
नवी मुंबई, ३० मार्च (वार्ता.) – नवी मुंबई महानगरपालिकेच्या जुईनगर येथील गावदेवी मैदानाची दुरवस्था झाली आहे. देखभाल दुरुस्तीअभावी त्याला बकालपण आले आहे. तेथे नियमितपणे स्वच्छता केली जात नसल्याने ठिकठिकाणी खड्डे असून कचर्याचे ढीगही आढळून येतात. या प्रकरणी स्थानिक खेळाडूंनी प्रशासनाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला आहे.
१. आजूबाजूच्या इमारतींतील नागरिक तेथे त्यांची वाहने उभी करतात. वाहनांना हानी पोचू नये; म्हणून तेथे मुलांना खेळण्यास प्रतिबंध केला जातो. काही वाहने तर बेवारस स्थितीत उभी आहेत.
२. मैदानाच्या पूर्वेला सार्वजनिक शौचालय आहे; परंतु सध्या ते नादुरुस्त असल्याने अनेक महिन्यापासून बंदच ठेवले आहे. ‘लवकरात लवकर नवीन शौचालय उभारण्यात यावे’, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
३. मैदानात राजकीय पक्ष आणि संस्था यांचे सामाजिक कार्यक्रम झाल्यानंतर खड्डे, कचरा आढळून येतो; पण राजकीय दबावामुळे कुणावरही कारवाई केली जात नाही.
४. मैदानामध्ये प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठबळामुळे बेकायदेशीरपणे आठवडे बाजार भरवला जातो. यामध्ये सुमारे २०० दुकाने लावली जातात. या वेळी प्रत्येक दुकानदाराकडून २०० ते ३०० रुपये बेकायदेशीरपणे वसूल केले जातात. (असे करणार्यांकडून कठोर दंडात्मक वसुली करायला हवी ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !