
नवी मुंबई, २८ मार्च (वार्ता.) – नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व मराठी शाळा सरसकट इंग्रजी माध्यमाच्या करण्याचा अशासकीय प्रस्ताव भाजपने बहुमताने संमत केला आहे; पण याला मनसेचा विरोध आहे, अशी माहिती मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी सीबीडी येथे पत्रकार परिषदेत दिली. या वेळी मनसेचे नगरसेवक अभिजित देसाई, उपशहराध्यक्ष सविनय म्हात्रे, शहरसचिव सचिन कदम, शहरअध्यक्ष संदेश डोंगरे आदी उपस्थित होते.
गजानन काळे पुढे म्हणाले की, नवी मुंबईत पालिकेत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सी.बी.एस्.ई.च्या) ३ शाळा आणि राज्य शिक्षण मंडळाच्या इंग्रजी माध्यमाच्या ५ शाळा आहेत. या शाळा चालू करतांना आम्ही विरोध केला नाही. मनसेचा विरोध हा सरसकट सर्व मराठी शाळा इंग्रजी माध्यमाच्या करण्याला आहे.
सर्व शाळा इंग्रजी केल्याने ६०० मराठी शिक्षकांच्या बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्याविषयी कोणतेही धोरण नाही. पालिकेच्या सर्व शाळांमध्ये अद्याप ‘फायर ऑडिट’ (अग्नी सुरक्षा परीक्षण) केले नाही. अग्नी सुरक्षेची कोणतीही साधने शाळेत नाहीत, अशी माहिती माहिती अधिकारात मिळाली आहे.
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
कराड येथील मूर्तीकारांच्या जागेचा प्रश्न सुटला !
पुणे येथील विश्रांतवाडीत सहस्रो वारकर्यांसाठी अखंड अन्नछत्र