|

नवी मुंबई – येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ २९ मार्चपासून देशातील ३० शहरांना जोडले जाणार आहे. यापूर्वी या विमानतळावरून १६ शहरांमध्ये दिवसा विमानप्रवास करता येत होता, आता २९ मार्चपासून या विमानतळावरून प्रवाशांना देशांतील ४६ शहरांत जाता येणार आहे. विमानतळ आस्थापनाने २९ मार्च ते २४ ऑक्टोबर या कालावधीत लागू झालेले वेळापत्रक घोषित केले आहे. या विमानतळावरून आता प्रत्येक आठवड्याला अनुमाने १ सहस्र ९२ उड्डाणे केली जातील, तर प्रतिदिन सरासरी १५६ उड्डाणे होतील.
विमानतळावरून देहलीला प्रतिदिन ९ उड्डाणे, गोवा येथे ७, बेंगळुरू येथे ६ आणि कोच्चि येथे ५ उड्डाणे नियोजित आहेत. यांसह भाग्यनगर (हैदराबाद), कोलकाता, लक्ष्मणपुरी (लखनौ), वाराणसी आणि इंदूर या शहरांमध्ये विमानप्रवास करता येईल. इंडिगो, अकासा एअर आणि एअर इंडिया एक्सप्रेस ही ३ विमान आस्थापने अतिरिक्त उड्डाणे चालवणार आहेत. त्यामुळे प्रवाशांसाठी पर्यायांची संख्या वाढणार आहे.
नवी मुंबई विमानतळावरून कोणत्या ३० शहरांमध्ये जाता येणार ?आग्रा, छत्रपती संभाजीनगर, अयोध्या, बागडोगरा, बरेली, बेळगाव, भावनगर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, दिऊ, दुर्गापूर, गोवा (दाबोलीम्), गोरखपूर, हिंडन, राजकोट (हिरा सर), हुब्बळ्ळी, जबलपूर, जम्मू, झारसुगुडा, कन्नूर, कोल्हापूर, मदुराई, कोलकाता, पटना, रायपूर, श्रीनगर, तिरुपती, तिरुवनंतपूरम् आणि विशाखापट्टणम् |
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा ! – मुख्यमंत्री
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !