भगवे झेंडे लावणार्‍या हिंदूंना मुसलमान महिलेची मारहाण, तर श्रीरामाच्या मूर्तीवर मुसलमानांकडून दगडफेक !

  • मुंबईतील श्रीरामनवमीच्या शोभायात्रेत घडली घटना !

  • धर्मांध मुसलमानांनी हिंदूंना धमकावले !

मुंबई – येथील मालवणी परिसरात श्रीरामनवमीच्या शोभायात्रेच्या पूर्वसिद्धतेसाठी रामभक्त भगवे झेंडे आणि पताका लावत होते. ते मशिदीच्या समोरील रस्त्यात आल्यावर तेथे मुसलमानांनी त्यांना विरोध केला. एका मुसलमान महिलेने रामभक्तांना मारहाण केली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचे सांगण्यात येत आहे; कारण विरोध चालू होताच मोठ्या संख्येने धर्मांध मुसलमान तेथे जमा होऊन रामभक्तांना धमकावू लागले. ‘सकल हिंदु समाजा’ने धर्मांधांच्या विरोधात लेखी तक्रार प्रविष्ट (दाखल) केली असून त्यात जीवघेणे आक्रमण आणि दंगल घडवून आणण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही शोभायात्रा सवेरा चौकात आल्यावर धर्मांधांनी श्रीरामाच्या मूर्तीवर दगडफेक केली. तेव्हा तेथे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसरात बॅरिकेडिंग (प्रतिबंधात्मक कुंपण) करत कडक बंदोबस्त तैनात केला.

मालवणी पोलीस ठाणे या परिसरापासून अगदीच जवळ आहे. संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (पोलीस ठाणे जवळ असतांनाही धर्मांध उच्छाद मांडतात, हे पोलीस प्रशासनाचे अपयशच ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • श्रीरामनवमीच्या शोभायात्रेत असे प्रकार व्हायला हा भारत आहे कि पाकिस्तान ?
  • हिंदू अतीसहिष्णू असल्यानेच धर्मांध त्यांच्यावर अरेरावी करतात  आणि कायदा-सुव्यवस्था धुडकावतात. वारंवार सण-उत्सवांना गालबोट लागू नये, यासाठी हिंदूंनीच आता हिंदूसंघटनाचे सामर्थ्य दाखवावे ! 
  • हिंदु राष्ट्रातच सर्व सण-उत्सव आनंदाने आणि सुरक्षितरित्या साजरे करता येणार असल्याने लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना करा !