पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेताच बालेन शाह यांची धडक कारवाई !

काठमांडू (नेपाळ) – नेपाळमध्ये ३५ वर्षीय ‘रॅपर’ (आधुनिक प्रकारचे संगीत सादर करणारा) बालेन शाह यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेताच धडक कारवाई करत माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना २८ मार्चला पहाटे त्यांच्या निवासस्थानाहून अटक केली. नेपाळमध्ये सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या ‘जेन झी’ (जनरेशन झेड – वर्ष १९९६ ते वर्ष २०१० या कालावधीत जन्मलेली पिढी) आंदोलनात अनेक नागरिकांच्या झालेल्या मृत्यूच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याच प्रकरणात नेपाळचे माजी गृहमंत्री रमेश लेखक यांनाही पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
🚨 Big political shake-up in Nepal
Former PM K. P. Sharma Oli arrested over deadly Gen Z protests; just a day after Balendra Shah took oath as PM.
⚖️ Oli calls it “vindictive”, vows legal fight
🔥 #GenZ Protests had left 70+ dead, including many youth
PC: @airnewsalerts pic.twitter.com/XT95tfBQzT
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 28, 2026

काय होते‘जेन झी’ आंदोलन ?
तत्कालीन ओली सरकारने फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, यूट्युब यांसारख्या एकूण २६ सामाजिक माध्यमांवर बंदी घातली होती. या बंदीच्या विरोधात सप्टेंबर २०२५ मध्ये नेपाळमधील तरुणांनी ओली सरकारविरुद्ध प्रचंड मोठे आंदोलन केले. यालाच ‘जेन झी’ आंदोलन असे नाव देण्यात आले. डिजिटल स्वातंत्र्यासाठी चालू झालेली ही चळवळ एका व्यापक शासनविरोधी आंदोलनात रूपांतरित झाली. या आंदोलनात अनेक आंदोलक संसद भवनातही घुसले होते. त्यानंतर झालेल्या हिंसाचारात अनेकांचा जीव गेला, तर २ सहस्रांहून अधिक लोक घायाळ झाले. यानंतर तत्कालीन ओली सरकारने माघार घेत सामाजिक माध्यमांवरी बंदी मागे घेतली होती.
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !
बेंगळुरूमध्ये कचरा वेचणार्या सैबुलने विद्यार्थिनीवर केला बलात्काराचा प्रयत्न !
पान मसाला, गुटखा आणि भेसळीचे अन्नपदार्थ यांचा दीड कोटीहून अधिक किमतीचा साठा जप्त
Gujrat Crackdown Illegals Bangladeshi : गुजरातमध्ये घुसखोरांविरुद्ध ‘ऑपरेशन डेल्टा हंट’ : २ दिवसांत ५०१ बांगलादेशी नागरिकांना अटक !
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद