स्थानिकांचा विरोध !

हुब्बळ्ळी (कर्नाटक) – व्यापारी शहर असलेल्या हुब्बळ्ळीमध्ये अवैध मशिदीच्या बांधकामाचे सूत्र एका मोठ्या वादाचे कारण बनले आहे. शहरातील सवणूर भागातील एका निवासी भूखंडावर अवैधपणे मशीद बांधली जात असल्याचा आरोप करत हिंदु संघटनांचे सदस्य आणि स्थानिक नागरिक यांनी नुकतेच आंदोलन केले. हे अवैध बांधकाम तात्काळ थांबवावे, अशी मागणी आंदोलकांनी या वेळी केली. (यासाठी स्थानिक नागरिकांना आंदोलन का करावे लागते ? पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा स्वत:हून कारवाई का करत नाही ? – संपादक)
१. आंदोलकांच्या आरोपानुसार, ३ ते ४ वर्षांपूर्वी वरील ठिकाणी सामान्य भूखंडाच्या नावाखाली जागा खरेदी करण्यात आली होती. घर उभारण्यासाठी घेतलेल्या जागेवर आता अवैधपणे मशिदीचे बांधकाम चालू करण्यात आले आहे. निवासी क्षेत्रात मशिदीचे बांधकाम चालू केल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. या अवैध बांधकामाला हुब्बळ्ळी-धारवाड महानगरपालिकेचे अधिकारीच थेट उत्तरदायी असल्याचा आरोप हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
२. स्थानिक रहिवासी प्रारंभीपासूनच या बांधकामाला विरोध करत असतांनाही महानगरपालिकेच्या अधिकार्यांनी कुठलीही कारवाई न करता मौन बाळगले आहे.
३. ‘निवासी वसाहतींमध्ये अशा अवैध बांधकामामुळे शांतता भंग पावते. निवासी भूखंडावर मशीद बांधणे हे कायद्याचे स्पष्ट उल्लंघन आहे’, अशी तक्रार आंदोलकांनी केली.
४. घटनास्थळी सध्या तणावपूर्ण वातावरण असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाबहुतांश ठिकाणी मुसलमानांना घरे नाकारण्याच्या घटना का घडतात ?, हे यावरून लक्षात येते ! याविषयी मुसलमान नेते आणि मुसलमानप्रेमी राजकीय पक्ष गप्प का ? |
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी