गोप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे – शहरातील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर २० ते २३ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘गाय आधारित वैश्विक शिखर संमेलन आणि एक्स्पो’ म्हणजेच ‘गौ टेक २०२६’चा उत्साहात समारोप झाला. ‘ग्लोबल कॉन्फेडरेशन ऑफ काऊ बेस्ड इंडस्ट्रिज्’ (जीसीसीआय), ‘महाराष्ट्र गोसेवा आयोग’ आणि ‘आर्.आर्. काबेल’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या आंतरराष्ट्रीय परिषदेला महाराष्ट्रासह देशभरातील गोसेवक, संशोधक आणि गोभक्त यांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.
सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनास मान्यवरांची भेट !

प्रदर्शनामध्ये लावण्यात आलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या कक्षाला ‘जीसीसीआय’चे संस्थापक, तसेच भारत सरकारच्या ‘कामधेनू आयोगा’चे पूर्व मंत्री आणि पूर्व अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथिरिया, अधिवक्ता श्री. चेतन वारुणकर, ‘चितळे डेअरी’चे संचालक श्री. गिरीश चितळे, ‘रामराज्य संकल्प साधना फाऊंडेशन’ आणि ‘जनमित्र सेवा संघ, पुणे’चे डॉ. दिलीप कुलकर्णी, ‘गोटेक कोअर कमिटी’चे श्री. कौस्तुभ देशपांडे, ‘सांस्कृतिक वार्तापत्र’च्या व्यवस्थापक श्रीमती सुनीता पेंढारकर आदींनी भेट दिली.
‘कामधेनू ट्रस्ट’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेश शर्मा यांनीही संस्थेच्या कक्षाला भेट दिली. या वेळी संस्थेच्या कार्याचे कौतुक करतांना ते म्हणाले, ‘‘तुमचे कार्य बहुमोल असून साधक ज्या सेवाभावाने हे कार्य करतात, ते वाखाणण्याजोगे आहे. देहली येथील ‘शंखनाद महोत्सवा’तही मी हा अनुभव घेतला आहे. तुमचे हे धर्मकार्य असेच अविरत चालू राहू दे !’’
गायीला पशूवधगृहाकडे न धाडता तिचे योग्य पालनपोषण करावे ! – शेखर मुंदडा, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष

देशी गाय ही केवळ दुधासाठी नसून तिचे शेण आणि गोमूत्र हेसुद्धा अमूल्य आर्थिक स्रोत आहेत, हे आजच्या प्रदर्शनातून स्पष्ट झाले आहे. आपल्या पूर्वजांनी जपलेल्या भूमीप्रमाणे किंवा सोन्याप्रमाणेच देशी गाय हे एक महत्त्वाचे ‘धन’ असून, तिला पशूवधगृहाकडे न धाडता तिचे योग्य पालनपोषण करणे, हे प्रत्येक शेतकर्याचे कर्तव्य आहे. ज्याप्रमाणे आपण आपली जन्मदात्री माता आणि भारतमाता यांचा सन्मान करतो, त्याचप्रमाणे गोमातेलाही मातेचे स्थान देऊन तिची सेवा करणे आवश्यक आहे, जेणेकरून आर्थिक स्वावलंबन प्राप्त होऊन कुणापुढेही साहाय्यासाठी हात पसरण्याची वेळ येणार नाही.
विशेष सहकार्य ! : ‘जनमित्र सेवा संघ, पुणे’चे डॉ. दिलीप कुलकर्णी यांनी ग्रंथ कक्षासाठी सहकार्य केले.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव