
निपाणी (कर्नाटक) – श्रीरामनवमीच्या निमित्ताने रामपूर येथील चौकाचे ‘श्रीराम चौक’ असे नामकरण करण्यात आले. येथील हिंदु जनजागृती समितीच्या शाखेतील सर्वश्री प्रथमेश पोवार, वैभव निकम, सुजित पोवार, अमित तिबिले, सार्थक वाघमोडे, तसेच अन्य काही कार्यकर्ते यांचा यात पुढाकार होता. हिंदु जनजागृती समितीचे साधक श्री. जुगलकिशोर वैष्णव यांच्या हस्ते श्रीरामाच्या प्रतिमेचे आणि ध्वजाचे पूजन करून आरती करण्यात आली, तसेच नूतन फलकाचे अनावरण करून प्रसाद वाटप करण्यात आले.
श्री. जुगलकिशोर यांनी श्रीरामाची वैशिष्ट्ये सांगून सर्वांना श्रीरामाचा नामजप करण्याचे आवाहन केले. समारोपाच्या प्रसंगी सर्वांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा घेतली. या प्रसंगी रामपूर गावातील ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ उपस्थित होते.
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
आदिवासींच्या घरांच्या बांधकामाला मुसलमानांचा विरोध : पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर काम चालू