इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन !

महाराणी ताराबाई आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह मराठेशाहीचा धगधगता इतिहास पुढे आणण्यात केले मोठे कार्य !

इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार

कोल्हापूर – तब्बल ६० वर्षे परिश्रम करून ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ हा प्रमाण ग्रंथ लिहिणारे आणि राजाराम महाराज, सेनापती संताजी घोरपडे यांचा मराठेशाहीतील बुलंद इतिहास मांडणारे ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे २६ मार्च या दिवशी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.

१. ‘छत्रपती संभाजी : एक चिकित्सा’ या ग्रंथाद्वारे त्यांनी पुराव्यांच्या आधारे छत्रपती संभाजी महाराजांवरील सर्व चुकीच्या आरोपांचे खंडन केले.

२. बहुजनांचे प्रतिनिधित्व करणार्‍या पवार यांच्या ‘राजर्षी शाहूंची गौरव गाथा’ या चरित्रग्रंथाचे १५ भारतीय आणि २५ विदेशी भाषांत भाषांतर झाले आहे.

३. बहुजनांसाठी आरक्षणाची संकल्पना प्रथम शाहू महाराजांनी मांडल्याचे त्यांनी सांगितले.

४. वर्ष १९९२ मध्ये ‘महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी’ची स्थापना करून त्यांनी इतिहास संशोधनाला लोकचळवळीचे स्वरूप दिले.

५. मराठेशाहीचा जाज्वल्य इतिहास सांगणारे त्यांचे २३ संशोधन ग्रंथ आहेत. त्यांना ११ पुरस्कार मिळाले आहेत.