युक्रेनने रशियाच्या तेलवाहू नौका केल्या जप्त

नवी देहली – हॉर्मुझ सामुद्रधुनीवरील इराणच्या नाकेबंदीमुळे तेल वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. अशा परिस्थितीत रशियाच्या तेलाने भारतासह जगातील ऊर्जा गरजांचा मोठा भाग पूर्ण केला; मात्र आता रशियाच्या तेल पुरवठ्यावरही संकट निर्माण झाले आहे. युक्रेनच्या अलीकडील आक्रमणांमुळे रशियाला मोठी हानी झाली आहे. ड्रोन आक्रमणांमुळे रशियाच्या तेलवाहिन्यांची मोठी हानी झाली असून अनेक तेलवाहू नौकाही जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रशियाची किमान ४० टक्के तेल निर्यात क्षमता ठप्प झाली आहे. जगातील दुसर्या क्रमांकाच्या तेल निर्यातदार देशासाठी ही गंभीर स्थिती आहे.
Global Energy Alert ⚡️
Ukraine’s strikes on Russia are now hitting nearly 40% of its oil exports – with tanker seizures and key infrastructure disruptions.
🌍 Why it matters:
Russia had become a major fallback supplier amid Strait of Hormuz tensions.Any disruption now risks… https://t.co/UKUXorHKvR pic.twitter.com/TLXOz44izj
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 26, 2026
निर्यात बंदरांवर लक्ष्य
या महिन्यात युक्रेनने रशियाच्या तेल पायाभूत सुविधांवर ड्रोन आक्रमणे तीव्र केली आहेत. विशेषतः ३ प्रमुख निर्यात बंदरांना लक्ष्य करण्यात आले आहे. काळ्या समुद्रातील नोवोरोस्सिएस्क बंदर, बाल्टिक समुद्रातील प्रिमोर्स्क आणि उस्त-लुगा बंदरे यांचा यात समावेश आहे.
रशियाची हानी
रशियाची सुमारे २० लाख बॅरल प्रतिदिन निर्यात क्षमता बंद पडली आहे. युक्रेनमार्गे हंगेरी आणि स्लोव्हाकिया यांकडे जाणार्या द्रुझबा तेलवाहिनीच्या काही भागाची आक्रमणांंमुळे हानी झाली आहे. आक्रमणानंतर नोवोरोस्सिएस्क टर्मिनल ७ लाख बॅरल प्रतिदिन क्षमतेपेक्षा पुष्कळ अल्प स्तरावर कार्यरत आहे. युरोपमध्ये रशियाशी संबंधित तेलवाहू नौका जप्त झाल्यामुळे मरमंस्क बंदरातून होणारी ३ लाख बॅरल प्रतिदिन आर्क्टिक तेल निर्यात थांबली आहे.
भारतावर परिणाम
रशियाकडून होणारा तेल पुरवठा अल्प झाल्यास भारतावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या निर्बंधांपूर्वी भारताने गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात रशियाचे तेल खरेदी केले होते. इराण युद्धाच्या काळात अमेरिकेने रशियाच्या तेलावरील ३० दिवसांचा बंद उठवल्यानंतर भारताला मोठ्या प्रमाणात पुरवठा मिळाला. भारताने पुढील महिन्यासाठी ६० मिलियन बॅरल रशियाच्या कच्च्या तेलाची नोंदणी केली आहे. पुरवठा खंडित झाल्यास देशातील तेल उपलब्धतेवर परिणाम होऊ शकतो आणि पेट्रोल-डिझेल यांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
तेलाच्या किमतीत वाढ
इराण युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती १०० (९ सहस्र ४०० रुपये) डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्या आहेत. अमेरिकी डब्ल्यूटीआय तेलाच्या किमतीतही सुमारे २ टक्के वाढ होऊन त्या ९२ डॉलर प्रति बॅरलच्या वर होत्या. रशियाच्या अर्थव्यवस्थेसाठी तेल उत्पन्न हा मुख्य आधार आहे.
संपादकीय भूमिकाहॉर्मुझ सामुद्रधुनीला पर्याय म्हणून रशियाकडून अनेक देशांना तेल मिळू लागले होते; मात्र जर युक्रेनच्या आक्रमणांमुळे या तेलाच्या पुरवठ्यावर बंधने येत असतील, तर जगासाठी मोठे संकट असून भारतानेही याकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक ठरते ! |
Putin Praises India : भारतीय हे जगातील सर्वांत प्रतिभावान लोकांपैकी एक आहेत ! – व्लादिमिर पुतिन, राष्ट्राध्यक्ष, रशिया
इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतेची मोठ्या प्रमाणात हानी ! – Donald Trump
अमेरिकेतील ‘ब्लूमबर्ग’ या वृत्तसंस्थेकडून भारतविरोधी लेख मागे !
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
Trump Warns Iran : आमच्या सैनिकांना हात जरी लावला, तरी युद्ध पेटेल !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation