
आज श्रीरामनवमीच्या निमित्ताने एक अतिशय वेगळे चित्र आपल्यासमोर सादर करत आहे. हे चित्र फार वेगळे आणि जुने असून या चित्रामध्ये सीतेने मराठी पद्धतीची साडी नेसून पदर खोचलेला आहे. तिच्या नाकात नथ, गोल अंबाडा आणि त्यावर मोत्यांची वेणी, कानात झुंबर, हातात तोडे, वाकी असून तिघांच्याही वस्त्राचे सोगे/ओचे समोर सोडलेले आहेत. रामाच्या अंगावर राजवस्त्रे असून तो कोदंडधारी आहे. लक्ष्मणाच्या अंगावर उपरणे असले, तरी पूर्ण उत्तरीय वस्त्र नाही. तो उघडा आहे. त्यानेही धनुष्य धारण केले आहे. पाठीवर असलेल्या बाणांच्या भात्याचा पट्टा हा प्रथमच तपशीलवार पहायला मिळतो. सकृतदर्शनी मराठी वाटावीत, अशी वस्त्रप्रावरणे आणि दागिने आहेत. या मूर्तींचे चेहरे नाजूक अन् सुंदर आहेत. सर्वांत वेगळेपणा, म्हणजे सीतेने शालीनतेने श्रीरामाचा डावा हात धरला आहे. धार्मिक विधी करतांनाची काही चित्रे सोडली, तर मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाच्या संबंधित हे दृश्य फारसे पहायला मिळत नाही.

हे चित्र पुष्कळच जुने असून ते त्या काळात लाहोर येथे न्यायाधीश म्हणून कार्यरत असलेल्या भिडे यांच्या घरातील आहे. त्यांचे नातू श्रीनिवास माटे (वय ८६ आणि आता अमेरिकेत वास्तव्य) यांच्या संग्रहातील हे दुर्मिळ चित्र सध्या अत्यंत खराब झाले आहे. तथापि कृत्रिम बुद्धीमत्ता वापरून मी ते पुनर्जीवित केले आहे. अयोध्येमध्ये पुन्हा दिमाखात अवतरलेल्या या प्रभु श्रीरामचंद्राला ‘भूयो भूयो नमाम्यहम् ।’
– श्री. मकरंद करंदीकर, ठाणे. (२०.३.२०२६)
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !