श्री महाकाली मंदिराची यात्रा करणार्‍या हिंदु तरुणीवर मुसलमान तरुणांकडून आक्रमण !

  • गैरवर्तन आणि छळ केल्याचा आरोप !

  • हिंदूसंघटनाची आवश्यकता अधोरेखित करणारी घटना ! 

प्रतीकात्मक छायाचित्र

वाल्सद (गुजरात) – दक्षिण गुजरातच्या वाल्सद येथून पावागड टेकडीवरील श्री महाकाली मंदिराकडे जाणार्‍या पदयात्रेत सहभागी झालेल्या एका हिंदु तरुणीवर काही मुसलमान तरुणांनी आक्रमण केले. धार्मिक यात्रेत सहभागी झालेल्या हिंदु तरुणीशी दुचाकीवरून आलेल्या या मुसलमान तरुणांनी गैरवर्तन केले आणि तिचा छळ चालू केला. ही धक्कादायक घटना पवित्र स्थळी पोचण्यापूर्वी अवघ्या काही किलोमीटर अंतरावर घडली. गुजरात पोलिसांनी याविषयी प्रसारित झालेल्या व्हिडिओची नोंद घेतली असून पीडित तरुणीशी संवाद साधला आहे.

१. पीडित हिंदु तरुणी म्हणाली, ‘‘मी पावागडच्या दिशेने चालत होते. या वेळी काही मुसलमान तरुण त्यांच्या दुचाकी वेगाने पुढे-मागे नेत होती आणि मला त्रास देत होते. त्यांनी माझ्यावर आक्रमण केले आणि हातावर जोरात प्रहार केला आणि तिथून निघून गेले.’’

२. या तरुणीच्या प्रवासाचा प्रारंभ ९ मार्च या दिवशी झाला होता. ती तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर प्रतिदिनच्या घडामोडी प्रसारित करत होती. मुसलमान तरुणांनी केलेल्या आक्रमणाचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर प्रसारित केला होता.

३. गुजरात पोलिसांनी प्रसारित झालेल्या या व्हिडिओला प्रतिसाद देत स्पष्ट केले आहे की, त्यांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून पीडित तरुणीशी संवाद साधला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Denisha Vasan (@denuu24_)

संपादकीय भूमिका

हिंदू संघटित असते, तर मुसलमान तरुणांचे हिंदु तरुणीवर आक्रमण करण्याचे धाडस झाले असते का ?