पाकपुरस्कृत आतंकवादी हाफीज सईद आणि सय्यद सलाहुद्दीन यांच्याशी होता संपर्क

नवी देहली – आंतकवादाच्या प्रकरणातील एका खटल्याचा महत्त्वपूर्ण निकाल देतांना देहली न्यायालयाने काश्मिरी फुटीरतावादी महिला नेता आणि ‘दुख्तरान-ए-मिल्लत’ची प्रमुख आसिया अंद्राबी हिला ‘बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा’ अर्थात् अनलॉफूल ॲक्टिव्हिटीस प्रिव्हेंशन ॲक्ट (युएपीए) च्या अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याच खटल्यातील न्यायालयाने तिच्या सहकारी सोफी फहमीदा आणि नाहिदा नसरीन यांनाही ३० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. ‘अंद्राबी हिची कृत्ये म्हणजे भारताच्या विरोधात युद्ध पुकारण्याचाच प्रकार असल्याचे सरकारी अधिवक्त्यांनी युक्तीवादात नमूद केले. न्यायालयाने ते ग्राह्य धरले. आसिया अंद्राबी हिला शिक्षा झाल्याने जिहादी आतकंवादाचा प्रचार, जिहादी कारवायांना निधी पुरवठा आणि सीमापार समन्वयाद्वारे भारतविरोधी कारवायांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप असलेल्या अनेक फुटीरतावादी गटांच्या विरोधात सुरक्षायंत्रणाच्या दीर्घकाळ चाललेल्या कारवायांना मोठे यश मिळाले आहे.
१. शिक्षेच्या प्रमाणाविषयी सविस्तर युक्तीवाद झाल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश चंदर जित सिंह यांनी हा निर्णय घोषित केला. या तिघींनाही यापूर्वी १४ जानेवारी या दिवशी युएपीएच्या अनेक कठोर कलमांखाली दोषी ठरवण्यात आले होते. यामध्ये कलम २० (आतंकवादी संघटनेचे सदस्यत्व), ३८ (आतंकवादी संघटनेशी संबंध) आणि ३९ (आतंकवादी संघटनेला समर्थन) यांचा समावेश होता.
२. न्यायालयाने तिला भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ अ (गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे), १५३ ब (राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणारी कृत्ये), १२० ब (गुन्हेगारी कट), ५०५ (सार्वजनिक उपद्रव निर्माण करणारी विधाने) आणि १२१ अ (राज्याविरुद्ध युद्ध पुकारण्याचा कट) या कलमांखाली दोषी ठरवले आहे.
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेची मागणी
१. आसिया अंद्राबी हिला अधिकाधिक आणि कठोर शिक्षा द्या.
२. देशविरोधी कटांना आळा घालण्यासाठी आणि देशाचे सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी तिला कठोर शिक्षा द्यावी.
आसिया अंद्राबी कुणाच्या संपर्कात होती ?
१. लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफीज सईद आणि ‘हिजबुल मुजाहिदीन’चा आतंकवादी सय्यद सलाहुद्दीन
२. अनेक आंतरराष्ट्रीय आणि सीमापार असलेले आतंकवादी
३. पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांचे परराष्ट्र धोरण सल्लागार सरताज अझीझ
४. देहलीतील पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील अधिकारी
संपादकीय भूमिकादेशविरोधी कारवाया करण्यात धर्मांध मुसलमान पुरुषांसह अशा मुसलमान महिलाही मागे नाहीत, हेच यावरून लक्षात येते ! |
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
Karnataka Fake Currency Racket : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
माफियांना नरकात किंवा कारागृहातच पाठवणार ! – CM Yogi Adityanath
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !