
वर्ष २०१४ पूर्वी चित्रपटसृष्टी किती किती स्वच्छ आणि कलात्मक होती नाही ? ‘प्रोपोगंडा’ (प्रचार) वगैरे सगळे चालू झाले, ते वाईट मोदी आल्यानंतरच !
आता वर्ष १९८३ चा ‘कूली’ हा कलात्मक चित्रपटच बघा ना ! ‘व्हिलन’ (खलनायक) असलेल्या अभिनेते सुरेश ओबेरॉयच्या हातात त्रिशूळ, तर हिरो (नायक) अभिनेते अमिताभच्या हातात साम्यवाद्यांचा विळा आणि हातोडा. किती ‘सटल’ (समजायला कठीण) आणि ‘सिंबॉलिक’ (प्रतिकात्मक) नाही ? यात आहे कुठे ‘प्रोपोगंडा’ ? शक्यच नाही. तेव्हा सारे कसे छान छान होते !
नसीरुद्दीन शाह वगैरे ‘थोर्थोर’ (पुष्कळ मोठी) मंडळी म्हणतात, ते खरेच आहे. ‘This is not the India I grew up in.’ (मी ज्या भारतात वाढलो, तो हा भारत नाही.) ‘आमच्या’ भारतातील चित्रपटांवर राज्य होते, ते लोकशाही, ‘सेक्युलॅरिझम’ (निधर्मीवाद) आणि आविष्कारस्वातंत्र्य यांचे रक्षणकर्ते असलेल्या जिहादी-साम्यवादी युतीचे ! गेले ते दिवस !
– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे.
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
निष्क्रीयता टाळा !
काँग्रेसवाले आणि गोहत्येचे समर्थन करणारे यांना याविषयी काय म्हणायचे ?