एल्.पी.जी. गॅसअभावी विदर्भात बेकरी व्यवसाय ठप्प !

  • आखाती देशांतील युद्ध  

  • ‘पार्ले-जी’ बिस्किटांचे कारखाने बंद

  • अर्धेच वेतन मिळाल्याने कामगार संतप्त

नागपूर – आखाती देशात चालू असलेल्या युद्धामुळे देशभरातील व्यावसायिक एल्.पी.जी. गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी विदर्भात ‘पार्ले-जी’ बिस्किटांचे उत्पादन करणारे २ कारखाने बंद पडले. ‘पार्ले-जी’च्या अन्य आस्थापनांवरही परिणाम झाला आहे. नागपूर येथील ‘हल्दीराम’ आणि ‘अजित बेकरी’ यांच्या उत्पादनावरही परिणाम झाला. खामगाव (बुलढाणा) येथील ‘शिवांगी बेकर्स’मधील ‘क्रीम’ आणि ‘ग्लुकोज’ यांच्या बिस्किटांचे उत्पादन ११ मार्चपासून ठप्प झाले आहे. त्यामुळे ५०० कामगार प्रतिदिन उपस्थिती लावून परत जात आहेत. कामाअभावी आस्थापनाने त्यांना निम्मेच वेतन दिले. त्यामुळे कामगार संतप्त झाले.

येथील १२५ हॉटेलमधील चायनीज खाद्यपदार्थ बंद करण्यात आले आहेत. काही ठिकाणी कामगारांच्या जेवणात एकवेळ पोळी देणे बंद करण्यात आले आहे. त्याऐवजी भाताचे प्रमाण वाढवले आहे. कंत्राटी कामगारांना निवास नसल्याने त्यांच्याकडे घरगुती सिलिंडरही नाही. बाहेरची हॉटेल, खानावळी बंद झाल्याने त्यांना केवळ १ – २ फळे खाऊन श्रमाची कामे करावी लागत आहेत.

संपादकीय भूमिका

देशावरील या आर्थिक संकटाचा सामना करण्यास सरकार, प्रशासन, नागरिक सिद्ध आहेत का ?