Dehradun Love Jihad : उत्तराखंड – अल्पवयीन हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून धर्मांतर

राशिदच्या विरोधात गुन्हा नोंद !

AI निर्मित चित्र

डेहराडून (उत्तराखंड) – येथे राशिद नावाच्या मुसलमान तरुणाने एका १५ वर्षांच्या अल्पवयीन हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने राशिदसह त्यांच्या शेजारी रहाणार्‍या गुलिस्ता आणि सारिक या मुसलमान भाऊ-बहिणीच्या विरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

पीडित हिंदु मुलीच्या आईने तक्रारीत म्हटले आहे की, राशिदने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते. त्यांच्या अनुपस्थितीत राशिद घरी येऊन त्यांच्या अल्पवयीन मुलीवर इस्लाम स्वीकारण्यासाठी मानसिक दबाव आणत होता. राशिद त्यांच्या मुलीला बुरखा परिधान करायला, तसेच इस्लामी पद्धतीनुसार आचरण करायला शिकवत होता. मुलगी हळूहळू इस्लामी पद्धती शिकू लागली आणि त्यानुसार वागू लागली. तिच्यात होत गेलेले पालट पाहून त्या चिंतेत पडल्या. मुलीला फूस लावून धर्मांतर करण्यासाठी भाग पाडण्यात आले. त्यांच्या शेजारी रहाणार्‍या गुलिस्ता आणि सारिक या मुसलमान भाऊ-बहिणीचा या कटात सहभाग आहे. आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी पीडितेच्या आईने केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

देवभूमी असलेल्या उत्तराखंडमध्ये असे प्रकार घडणे हिंदूंना लज्जास्पद !