|
काठमांडू (नेपाळ) – नेपाळमधील कपिलवस्तू येथे ईदच्या दिवशी मुसलमानांच्या जमावाने मंदिरात ध्वनीक्षेपकावरून भजन चालू असल्याच्या कारणावरून मंदिरावर आक्रमण केले. मुसलमानांनी मंदिर परिसरात घुसून तोडफोड केली, ध्वनीक्षेपक फोडला आणि पुजार्यालाही मारहाण केली. ही घटना २१ मार्च या दिवशी सकाळी महाराजगंज परिसरातील बरगदी घाटाजवळील काली मंदिरात घडली. येथे चैत्र नवरात्रानिमित्त पूजा आणि भजन-कीर्तन चालू होते, त्याच वेळी मुसलमान नमाजपठण करत होते. घटनेची माहिती पसरताच मोठ्या संख्येने लोक निषेधासाठी रस्त्यावर उतरले आणि हिंसाचार झाला.
Tensions Flare in Nepal! 🇳🇵🚩
On the day of Eid, Kali temple was vandalized by fanatics objecting to bhajans on loudspeakers during Namaz. 🛕💥
Temple priest assaulted 🤕
Public outrage leads to violent protests ✊🔥
Police resort to firing to control the situation 👮♂️🔫
In a… pic.twitter.com/pdR6wgM6Ja
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 23, 2026
अनेक ठिकाणी संचारबंदी
बुटहानियाँ परिसरात जमाव एकत्र येऊन आरोपी मुसलमानांच्या अटकेची मागणी करू लागला आणि त्याने घोषणा देण्यास आरंभले. काही ठिकाणी टायर जाळून रस्ते अडवण्यात आले, त्यामुळे परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली. माहिती मिळताच प्रशासन आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोचले अन् जमावावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणात न आल्याने पोलिसांनी लाठीमार केला आणि अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या. तरीही जमाव आक्रमक झाल्याने पोलिसांना गोळीबार करावा लागला. या घटनेत पोलीस आणि सामान्य नागरिक यांसह एकूण ८ जण घायाळ झाल्याचे सांगितले जात आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बरगदी, महाराजगंज बाजार, हरदौना आणि बहादुरगंज परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका
|

गोमांसाची अवैधरित्या वाहतूक करणारा सरफराज ख्वाजा याला अटक
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
छत्रपती संभाजीनगर येथे धर्मांध मुसलमानाच्या विरोधात गुन्हा नोंद !
Dhubri Beef Arrest : धुबरी (आसाम) : गोमांस बाळगणार्या ५ जणांना अटक : गोमांस जप्त
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी भारताच्या दौर्यावर येणार !
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !