
काठमांडू (नेपाळ) – नेपाळमध्ये ३५ वर्षांचे तरुण नेते बालेन (बालेंद्र) शाह नवे पंतप्रधान होणार आहेत. ते येत्या २७ मार्च या दिवशी, म्हणजे श्रीरामनवमीच्या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. शाह यांनी त्यांच्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभ जनकपूर येथून केला होता. जनकपूर हे सीतामातेचे जन्मस्थान आहे.
या निर्णयाकडे भारताच्या संदर्भात पाहू नये ! – माजी प्राध्यापक एस्.डी. मुनी
जवाहरलाल नेहरू विद्यापिठाचे माजी प्राध्यापक एस्.डी. मुनी यांच्या मते, बालेन शाह यांची ही कृती लोकांच्या भावनांशी थेट जोडणारी आहे. त्यांचे समर्थक प्रामुख्याने तरुण असून ते राजेशाहीविरोधात आहेत. त्यामुळे त्यांच्या श्रीरामनवमीला शपथ घेण्याचा निर्णय जुन्या धार्मिक राजतंत्राशी जोडला जाऊ नये. या निर्णयाकडे भारताच्या संदर्भात पाहू नये. नेपाळने नेहमीच स्वतःची स्वतंत्र राष्ट्रीय आणि धार्मिक ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामध्ये रामायण परंपरेकडेही ते त्यांच्या दृष्टीकोनातून पहातात.
श्रद्धा आणि आधुनिक विचार यांचा समतोल साधणारा राजकीय संदेश ! – प्राध्यापक संजय भारद्वाज
प्राध्यापक संजय भारद्वाज यांचे मत आहे की, या निर्णयातून बालेन शाह हे हिंदु ओळखीपासून दूर जात नसल्याचा संकेत देत आहेत; परंतु राजेशाहीच्या काळातील त्या प्रकारच्या हिंदुत्वाची बाजू ते मांडत नाहीत, जेव्हा राजाला भगवान विष्णूचा अवतार मानले जात असे. म्हणजेच हा निर्णय केवळ धार्मिक प्रतीक म्हणून नाही, तर श्रद्धा आणि आधुनिक विचार यांचा समतोल साधणारा राजकीय संदेश आहे.
संपादकीय भूमिकाबालेन शाह हिंदुत्वाच्या वाटेवर चालतील का ?, हे येणारा काळच सांगेल. सध्या तरी त्यांचे विचार भारतविरोधीच आहेत, हे लक्षात ठेवले पाहिजे ! |
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी भारताच्या दौर्यावर येणार !
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी
चीनने भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि आता बांगलादेश यांच्या बंदराद्वारे घेरले !
गोपालगंज जिल्ह्यातील एकाच हिंदु कुटुंबातील ४ जणांवर आक्रमण