
कठीण आपत्काळाचे (महायुद्धाचे) आले आहे संकट ।
हिंदूनो, धैर्याने अन् श्रद्धेने साधना करून राहू आपण एक ।
हिंदु राष्ट्राची गुढी उभारू आकाशी उंच उंच ।। १ ।।
गुढी म्हणजे सनातनचा ‘धर्मध्वज’ जो असे तेजस्वी ।
रामनाम घेऊनी अन् साधना-सेवा करूनी ।
साधकांनो, प्रथम रामराज्य आणू आपुल्या अंतरी ।। २ ।।

‘राष्ट्र अन् धर्मनिष्ठा’ हेच आहेत जीवनातील पण ।
संकल्प करून अर्पूया राष्ट्र-धर्मास्तव आपुले जीवन ।
ईश्वरी कृपेने स्थापन होईल ते हिंदु राष्ट्र महान ।। ३ ।।
‘साधना वाढवून भक्त व्हा’, ही आज्ञा गुरुदेवांची (टीप १) ।
‘साधना, सेवा, तळमळ, धैर्य अन् निष्ठा’ वाढवूनी ।
गुरुकृपेने जिवंत राहून होईल आध्यात्मिक प्रगती ।। ४ ।।
साधना करून तळमळीने गुरुचरणी ठेवू मस्तक ।
भारतभूमी अन् धर्मरक्षण यांसाठी करू अर्पण सर्वस्व ।
गुढीपाडव्याच्या पावन दिनी करूया हा नवा संकल्प ।। ५ ।।
अंधारानंतर उषःकाल येतो, हाच निसर्गाचा नियम खरा ।
कठीण आपत्काळानंतर सूर्य उगवेल पहा हिंदु राष्ट्राचा ।
चालू होईल मग संपत्काळ, रामराज्य अन् आनंदाचा झरा ।। ६ ।।
टीप १ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची आज्ञा
– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत, वय ७९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.३.२०२६)
| • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक |
साधनेचे अद्वितीयत्व जाणून घ्या !
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
‘संगीतातील केवळ ७ स्वरांतून सर्व भाव-भावना कशा व्यक्त होतात ?’, या संदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !