१४ मुसलमानांना अटक
वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथे गंगानदीत विहार करणार्या नौकेत इफ्तारची मेजवानी आयोजित करण्यात आली होती. यात मांसाहारी पदार्थांचे सेवन करण्यात आले आणि शिल्लक भाग ज्यात हाडांचाही समावेश होता, तो नदीत फेकण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर संताप व्यक्त होऊ लागला. या प्रकरणात भारतीय जनता युवा मोर्चाचे महानगर अध्यक्ष रजत जायसवाल यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी अन्वेषण करून १४ मुसलमान तरुणांना अटक केली.
🚨 Ganga Incident Sparks Outrage
Iftar Party held on a boat in the Ganga; allegations of bones being thrown into the river – 14 arrested.
If people can act so brazenly in a sacred river, does it reflect a lack of fear of the law or consequences?
Acts that hurt religious… pic.twitter.com/4pfjgEyk38
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 18, 2026
या घटनेवर वाराणसी महानगरपालिकेनेही तीव्र आक्षेप नोंदवला. महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकार्यांनी ही कृती अत्यंत आक्षेपार्ह असल्याचे सांगितले. ‘गंगानदीची शुचिता आणि पावित्र्य राखण्यासाठी महानगरपालिकेच्या नियमांमध्ये स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आहेत. या नियमांनुसार घाटांवर किंवा नदीच्या मध्यभागी कोणतीही कृती करतांना धार्मिक भावना आणि स्वच्छतेचे निकष लक्षात घेणे आवश्यक आहे’, असे म्हटले आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी देखरेख आणि नियम अधिक कठोर केले जातील, जेणेकरून गंगानदीचे पावित्र्य आणि श्रद्धा यांना कोणतीही हानी पोचू नये’, असे प्रशासनाने म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचे असे धाडस होते; कारण त्यांना ना हिंदूंची भीती ना कायद्याची ! ही स्थिती पालटण्यासाठीच हिंदु राष्ट्र हवे ! |

महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
पुणे येथील येरवडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंजुम बागवान यांच्याकडून हिंदुद्वेषी आणि समाजविघातक कारवाया !
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !