संस्कृती संवर्धन आणि विकास महासंघ अन् विविध धार्मिक संस्था यांचा आयोजनात सहभाग !

चिंचवड (जिल्हा पुणे) – १९ मार्च या चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या म्हणजेच हिंदु नववर्षानिमित्त सायंकाळी ५ वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पतंजली योग समिती, विश्व हिंदु परिषद, आर्य समाज, आर्ट ऑफ लिव्हिंग, गायत्री परिवार, चिन्मय मिशन, सनातन संस्था अशा अनेक आध्यात्मिक, धार्मिक संस्था, तसेच गणेशोत्सव मंडळे आणि विविध सामाजिक संस्था अन् विविध समविचारी संघटना यामध्ये सहभागी होणार आहेत. अधिकाधिक हिंदु बांधवांनी या शोभायात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
शोभायात्रेचा मार्ग : दत्त मंदिर-लिंक रोड-शिवाजी उदय मंडळ-काकडे पार्क- विवेक वसाहत-साई मंदिर-पॉवर हाऊस चौक मार्गे मोरया गोसावी मंदिर आणि तेथून धनेश्वर मंदिर येथे सांगता होईल.
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
कराड येथील मूर्तीकारांच्या जागेचा प्रश्न सुटला !
मोशी (पुणे) कचरा दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार !