
रायपूर (छत्तीसगड) – छत्तीसगडमधील भाजप सरकारच्या मंत्रीमंडळाने ‘छत्तीसगड धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६’च्या प्रारूपाला संमती दिली. या विधेयकाकडे केवळ कायदेशीर कागदपत्रे (दस्तऐवज) म्हणून नव्हे, तर राज्याची सांस्कृतिक एकात्मता, आदिवासी ओळख आणि नागरिकांचे धार्मिक स्वातंत्र्य सुरक्षित करण्यासाठी व्यापक संरक्षण व्यवस्था म्हणून पाहिले जात आहे. सध्या चालू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात हे विधेयक सभागृहासमोर मांडले जाणार असून संमती मिळाल्यानंतर त्याचे प्रभावी कायद्यात रूपांतरित होईल.
🚨 Chhattisgarh Cabinet Approves anti-conversion bill
The BJP government’s cabinet in Chhattisgarh has approved 'Freedom of Religion Bill' aimed at curbing conversions through fraud, allurement, or coercion.
Instead of individual states passing such laws one by one, it is… https://t.co/UMONlZUUHQ pic.twitter.com/Xz3IaPBqNw
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 14, 2026
सरकारचे म्हणणे आहे की, धार्मिक श्रद्धा हा वैयक्तिक विषय असला, तरी त्यात प्रलोभन, फसवणूक किंवा दबाव यांचा समावेश झाला, तर तो सामाजिक सलोख्यासाठी धोकादायक ठरतो. हा धोका लक्षात घेऊन सरकारने जुन्या नियमांमध्ये पालट करून अवैध धर्मांतराच्या मुळावर प्रहार करणारी नवी संरचना सिद्ध केली आहे.
शिक्षा किमान १० वर्षे, तर कमाल जन्मठेप !
एखादी व्यक्ती किंवा गट मिळून मोठ्या संख्येने लोकांचे धर्मांतर केल्याच्या प्रकरणी दोषी आढळल्यास त्यांना किमान १० वर्षे आणि कमाल जन्मठेपेची, म्हणजे संपूर्ण आयुष्य कारागृहात घालवण्याची शिक्षा होऊ शकते. केवळ कारावासच नव्हे, तर किमान ५ लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
शिक्षेच्या नव्या तरतुदींनुसार अल्पवयीन, महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्गीय व्यक्ती यांचे धर्मांतर केल्यास संबंधित व्यक्तीला १० ते २० वर्षांपर्यंत कारावास आणि किमान १० लाख रुपये दंडाची शिक्षा होईल. तसेच सामान्य प्रकरणांत शिक्षा ७ ते १० वर्षे कारावास अन् ५ लाख रुपये दंड अशी आहे.
संपादकीय भूमिकाएकेक राज्याने अशा प्रकारचा कायदा करण्यापेक्षा केंद्रातील भाजप सरकारने संपूर्ण देशासाठी कायदा करणे आवश्यक आहे ! कारण काँग्रेस आणि अन्य हिंदुद्वेषी राजकीय पक्षांची सरकारे कधीही अशा प्रकारचा कायदा करणार नाही ! |
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !