|
(रिंगरोड म्हणजे शहराभोवती वर्तुळाकार पद्धतीने बांधलेला रस्ता)

नाशिक – येथे होणार्या सिंहस्थ कुंभपर्व २०२७ साठी शहरातील पायाभूत प्रकल्पांना गती आली आहे. ६९.१५ किलोमीटर लांबीच्या ‘नाशिक रिंगरोड’च्या नागरी बांधकामासाठी ३ सहस्र ९५४ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय अनुमती देण्यात आली. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूककोंडी न्यून होऊन सिंहस्थ कुंभपर्वाच्या कालावधीत वाहतूक सुलभ होण्यास साहाय्य्य होईल.
१. प्रस्तावित रिंगरोड ‘डी.आर्.डी.ओ. जंक्शन’पासून चालू होऊन शहराला वळसा घालून पुन्हा त्याच महामार्गाला जोडला जाणार आहे. हा ४ ते ६ पदरी मार्ग असून त्यात ५ मोठे पूल, २ रेल्वे उड्डाणपूल, ८ वाहन भुयारी रस्ते असतील.
२. यात्रेकरू सुविधा आणि पायाभूत सुविधा यांसाठी १९० कोटी रुपयांहून अधिक निधी संमत करण्यात आला आहे. नाशिक येथील रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ येथे ध्वजस्तंभ उभारण्यासाठी, तसेच ब्रह्मगिरी पर्वतावरील प्रदक्षिणा मार्ग विकास आणि अंजनेरी येथे ‘इको-टुरिझम’ (पर्यावरणपूरक पर्यटन) प्रकल्प यांसह अन्यही प्रकल्पांसाठीासाठी निधी देण्यात आला आहे.
एस्.टी.च्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त परिवहनमंत्र्यांकडून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ !
कंत्राटदाराला ५ लाख रुपये, तर सल्लागार संस्थेला २ लाख रुपयांचा दंड !
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !