‘गुरुकृपायोगानुसार साधना करतांना साधक ‘विचारणे, ऐकणे, स्वीकारणे, शिकणे आणि आढावा देणे’, या पंचसूत्रीनुसार साधनेचे प्रयत्न करतात. त्या संदर्भात देवाने मला सुचवलेले विचार येथे देत आहे.

१. पंचसूत्रीचे महत्त्व
अ. ‘साधकांची साधनेत जलद प्रगती व्हावी’, यासाठी गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) ‘विचारणे, ऐकणे, स्वीकारणे, शिकणे आणि आढावा देणे’, ही ५ सूत्रे नियमितपणे कृतीत आणून साधना करण्याची कार्यपद्धत घालून दिली आहे.
आ. ‘सेवा’ हा भक्ताला भगवंतात रूपांतरित करणारा परीस आहे. साधकांच्या हातून परीसासारखी सेवा होण्यासाठी प.पू. गुरुदेवांनी पंचसूत्रीरूपी सुवर्णाचे धागे साधकांना उपलब्ध करून दिले आहेत.
इ. ‘विचारणे, ऐकणे, स्वीकारणे, शिकणे आणि आढावा देणे’, ही सूत्रे साधकांनी पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेद्रिये, पंचप्राण, मन अन् बुद्धी या स्तरांवर स्वतःच्या चित्तशुद्धीसाठी आचरणात आणली पाहिजेत.
ई. कलियुगाचा महिमा असा आहे की, केवळ ही पंचसूत्री आचरणात आणली, तरी साधकाची संतत्वाकडे वाटचाल होऊ शकते.

२. पंचसूत्रींची आध्यात्मिक व्याख्या
२ अ. विचारणे : साधकांनी ‘विचारणे’, हा गुण आत्मसात करतांना अंतर्मन शुद्ध आणि सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून विचारणे अपेक्षित आहे. केवळ शाब्दिक विचारणा करणे, म्हणजे विचारणे नव्हे !
२ आ. ऐकणे : साधकांनी शरीर, मन, बुद्धी आणि अहं यांच्या स्तरावर ऐकण्याची कृती करून आचरण करणे, म्हणजे ऐकणे होय. जेव्हा साधक केवळ कानांनी ऐकून घेतो, तेव्हा ‘मी ऐकले’, असे वाटणे’, हा त्याला झालेला भ्रम आहे.
२ इ. स्वीकारणे : एखादी कृती अथवा प्रसंग याचे केवळ चिंतन किंवा मनन करणे, म्हणजे स्वीकारणे नव्हे ! खर्या अर्थाने एखादी कृती स्वीकारणे, म्हणजे ती परिस्थिती किंवा प्रसंग याचे काहीच न वाटणे होय.
२ ई. शिकणे : एखादी कृती शिकणे, म्हणजे ती स्वतः अनुभवून ती वृत्ती बनवणे आणि चित्तावर बिंबवणे होय. एखादी कृती निव्वळ पहाणे, ऐकणे किंवा लक्षात येणे, म्हणजे शिकणे नव्हे !
२ उ. आढावा देणे : सेवेचा आढावा देणे, म्हणजे ‘आज मी माझ्या चित्तशुद्धीसाठी कसे प्रयत्न केले ?’, हे देवाच्या चरणी मांडणे होय. सेवेच्या आढाव्यात ‘विचारणे, ऐकणे, स्वीकारणे आणि शिकणे’, या ४ सूत्रांचा समावेश आहे. ‘आज देवाने मला जो वेळ उपलब्ध करून दिला, त्याचा उपयोग मी समष्टी साधना करतांना कसा केला ? मी माझे शरीर, मन, बुद्धी, अहं आणि इंद्रिये देवाला अपेक्षित अशीच समर्पित केली ना ? तसे न करण्यामागे माझे कोणते षड्रिपू आड आले ?’, यांचे सखोल चिंतन आढावासेवकरूपी नारायणाच्या चरणी प्रांजळपणे मांडणे, म्हणजे आढावा देणे.’
– अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी, अंबरनाथ (पूर्व), जिल्हा ठाणे. (१३.१२.२०२५)
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
देश दुर्दशेला पोचण्यामागे हे आहे कारण !
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधनावृद्धी शिबिराच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
साधकांचा आधारस्तंभ असलेल्या आणि भजनांतून देवाला आळवणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नागपूर येथील कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर (वय ७१ वर्षे) !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !