
नांदेड – प्रेमभाव, ईश्वरप्राप्तीची तीव्र तळमळ आणि अल्प अहं असणार्या नांदेड येथील पू. (श्रीमती) अनिता बरारा (वय ७३ वर्षे) ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून सनातन संस्थेच्या १३८ व्या (समष्टी) संतपदी विराजमान झाल्या. हा भावसोहळा नांदेड येथे २५ फेब्रुवारीला भावपूर्ण वातावरणात पार पडला. या वेळी सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव, नांदेड येथील पू. (श्रीमती) बरारा यांचा मुलगा श्री. पंकज, सून सौ. रिचा आणि नातू कु. रिधान, तसेच नांदेड येथे सेवा करणारे साधक उपस्थित होते. पू. (श्रीमती) बरारा संत झाल्याचे ऐकून त्यांचे नातेवाइक आणि सर्व साधक यांना पुष्कळ आनंद झाला.
‘साधनेची तीव्र तळमळ आणि सेवाभावी वृत्ती’ असलेल्या नांदेड येथील श्रीमती अनिता बरारा (वय ७३ वर्षे) ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ‘समष्टी संत’ म्हणून सनातनच्या १३८ व्या संतपदी विराजमान !

‘नांदेड येथील श्रीमती अनिता सुरेंद्रपाल बरारा (वय ७३ वर्षे) वर्ष २००१ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. पहिल्यापासूनच त्यांच्यामध्ये साधनेचे पुष्कळ गांभीर्य आहे. सेवेची तीव्र तळमळ असलेल्या श्रीमती बरारा ‘विज्ञापने आणणे, अर्पण गोळा करणे, ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वर्गणीदार करणे, सत्संग घेणे इत्यादी सर्व सेवा मनापासून आणि सातत्याने करत आहेत. या वयातही त्यांचा सेवेतील उत्साह आणि तत्परता अगदी कौतुकास्पद आहे.
‘शांत स्वभाव, सहजता, साधनेची तळमळ आणि देवावरील श्रद्धा’ या गुणांमुळे त्या वर्ष २०१३ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाल्या. आरंभी त्यांचे यजमान कै. सुरेंद्रपाल बरारा (वय ७८ वर्षे) यांचा पत्नीच्या समष्टी साधनेला विरोध होता. साधनेची तळमळ असल्यामुळे श्रीमती बरारा यजमानांच्या विरोधाला तोंड देऊन सेवा करायच्या. त्यांच्या तळमळीमुळे यजमानांचा विरोध मावळला आणि नंतर तेही पत्नीला साधनेत साहाय्य करू लागले. वर्ष २०१६ मध्ये सुरेंद्रपाल बरारा यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली.
मायेपासून अलिप्त आणि भावावस्थेत असलेल्या श्रीमती बरारा यांच्या सहवासात सर्व साधकांना आनंद मिळतो. त्यांच्या समवेत सेवा करतांना साधकांना ‘स्वतःला चैतन्य मिळत आहे’, अशी अनुभूती येते. त्यांच्या देहात चैतन्याच्या स्तरावरील पालट होत आहेत. हे सर्व त्यांनी संतपद प्राप्त केल्याचे द्योतक आहे. वर्ष २०२५ च्या गुरुपौर्णिमेला श्रीमती बरारा यांची आध्यात्मिक पातळी ६९ टक्के होती. आजच्या शुभदिनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून त्या ‘समष्टी संत’ म्हणून सनातनच्या १३८ व्या संतपदावर विराजमान झाल्या आहेत.
पू. (श्रीमती) अनिता बरारा यांच्या देहातील पालट ओळखणार्या साधकांचे अभिनंदन ! साधकांनो, पू. (श्रीमती) बरारा यांच्या साधनेचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून तळमळीने साधनेचे प्रयत्न करा !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२५.२.२०२६)
असे उलगडले पू. (श्रीमती) अनिता बरारा यांच्या संतत्वाचे गुपित !
सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी त्यांच्या मार्गदर्शनापूर्वी ‘नांदेडमध्ये प्रारंभापासून सेवा करणार्या साधकांनी साधना आणि सत्सेवा यांना आरंभ कसा केला ?’, असे सांगायला सांगितले. काही साधकांनी स्वतःचे साधनेचे प्रयत्न सांगितले. त्यानंतर पू. (श्रीमती) अनिता बरारा यांनी साधनाप्रवास सांगितला. अजून काही प्रश्न विचारून सद्गुरु जाधव यांनी पू. (श्रीमती) अनिता बरारा यांचा भावमय साधनाप्रवास सर्वांसमोर ठेवला. साधनेचे प्रयत्न सांगून झाल्यानंतर सद्गुरु जाधव यांनी ‘श्रीमती अनिता बरारा यांची आध्यात्मिक पातळी ७१ टक्के झालेली आहे’, असा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी लिहिलेला संदेश वाचून दाखवून संतत्वाचे गुपित सर्वांसमोर उलगडले. या मंगलप्रसंगी पू. (श्रीमती) अनिता बरारा यांचा कृतज्ञताभाव दाटून आला. ही आनंदवार्ता ऐकल्यानंतर साधनाप्रवास ऐकतांना भाव स्थितीत गेलेल्या साधकांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. कुटुंबियांना पुष्कळ आनंद झाला. सर्वांनी मनोमन गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणी कृतज्ञता व्यक्त केली.
या वेळी सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या हस्ते पू. (श्रीमती) अनिता बरारा यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

पू. (श्रीमती) अनिता बरारा यांनी व्यक्त केलेले मनोगत !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामुळेच हे झाले ! – पू. (श्रीमती) अनिता बरारा
मन पुष्कळ आनंदी झाले; परंतु मी काहीच केले नाही. सर्व काही गुरुदेवच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) माझ्याकडून करून घेत आहेत. माझ्या रोमारोमामध्ये, अंतरात आणि माझ्यासमवेत सतत गुरुदेवच आहेत. गुरुदेव एवढे कृपाळू आहेत की, त्यांनी मला हा कृपाप्रसाद दिला, त्याविषयी केवळ कृतज्ञताच व्यक्त करू शकते. मी अज्ञानी आहे. मला काहीच येत नाही; परंतु वेळोवेळी सद्गुरु जाधवकाकांनी मला समजावून सांगितले आणि प्रयत्न करण्यास दिशा दिली. त्यामुळेच हे सर्व शक्य झाले. सर्व साधक, सद्गुरु काका आणि तिन्ही मोक्षगुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ती बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) यांच्याप्रती अनंत अनंत कोटी कृतज्ञता !
पू. (श्रीमती) अनिता बरारा व्यष्टी साधनेचे प्रयत्न परिपूर्ण करतात ! – सद्गुरु नंदकुमार जाधव

पू. (श्रीमती) अनिता बरारा यांचे वय ७३ वर्षे आहे. तरीही त्या नियमित सेवेला जातात. व्यष्टी साधनेचे प्रयत्न परिपूर्ण करतात. गुरुदेवांप्रती (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती) त्यांची दृढ श्रद्धा आहे. त्या गुरुदेवांचे स्मरण करतात आणि कर्तेपणा गुरुदेवांना अर्पण करतात. ‘सर्व काही गुरुदेव करतात’, असा त्यांचा भाव आहे. त्यांच्यामुळे घरातील सर्वजण साधना करू लागले. साधकांप्रती त्यांचा प्रेमभाव पुष्कळ आहे. आढावा घेतांना त्या साधकांना त्यांच्या चुका प्रेमाने सांगतात. सतत भावस्थितीत राहून त्या सर्व कृती करतात.
नातेवाइकांनी व्यक्त केलेले मनोगत

सनातन संस्थेमध्ये आल्यानंतर आईने तिचे जीवन साधनेसाठी समर्पित केले ! – श्री. पंकज बरारा (पू. (श्रीमती) अनिता बरारा यांचा मुलगा)
सनातन संस्था आणि सद्गुरु जाधवकाका यांच्यामुळेच आई आज संत झाली. सनातनमध्ये आल्यापासून तिने तिचे पूर्ण जीवन सेवा आणि साधना यांसाठीच समर्पित केले. हेच तिच्या जीवनाचे ध्येय होते.
आई (पू. (श्रीमती) अनिता बरारा) साधनेचे प्रयत्न नियमित करतात ! – सौ. रिचा बरारा (पू. (श्रीमती) अनिता बरारा यांची सून)
आईना संतपद प्राप्त झाले, हे ईश्वर आणि गुरु यांच्या कृपेने ! या दिवसाची आम्ही सर्वजण आतुरतेने वाट पहात होतो. हा दिवस आमच्या कुटुंबासाठी आनंदाचा क्षण आहे. आईने २६ वर्षे साधना आणि सेवा करण्यासाठी अर्पण केली आहेत. संसार करत असतांना बहुतांश वस्तूंमध्ये त्यांना आसक्ती नव्हती. गेली २ वर्षे आईची आध्यात्मिक पातळी तेवढीच राहिली होती, तर मी, माझा मोठा मुलगा शौर्य आणि आई यावर चिंतन करायचो. आईही आम्हाला वारंवार ‘मी कुठे अल्प पडते ?’, असे विचारायच्या. त्यांचे चैतन्य आम्हाला जाणवत होते. त्यांच्यामध्ये पुष्कळ शिस्त आहे. त्या साधनेचे प्रयत्न नियमित करतात. त्यांच्यात ईश्वरी गुण आहेत. त्या शांत आणि स्थिर असतात. त्यांच्यात विनम्रता, त्याग, प्रेम, धैर्य, सर्वांना समजून घेणे हे गुण आहेत. कोणत्याही परिस्थितीविषयी त्यांच्याशी चर्चा केली, तर लगेच त्यावर सकारात्मक उपाय मिळतो. त्या परिस्थितीनुसार जीवन जगतात. ईश्वर, गुरु, सनातन संस्था यांच्यावर त्यांचे पुष्कळ प्रेम आहे.
आजीमध्ये पुष्कळ गुण आहेत !– कु. रिधान बरारा (पू. (श्रीमती) अनिता बरारा यांचा नातू, वय १२ वर्षे)
आजी संत झाली हे ऐकून मला पुष्कळ आनंद होत आहे. आजीमध्ये पुष्कळ गुण आहेत. त्यातून मला नेहमी शिकायला मिळते. ती सर्वांवर पुष्कळ प्रेम करते. पुष्कळ कृतज्ञता !
आजी माझ्यासाठी आदर्श आणि प्रेरणा आहे ! – श्री. शौर्य बरारा (पू. (श्रीमती) अनिता बरारा यांचा नातू) (वय १९ वर्षे)
आजी अनेक वर्षांपासून करत असलेली साधना, समर्पण, ईश्वराची भक्ती यांचे हे फळ आहे. आजीला मी लहानपणापासून प्रतिदिन प्रार्थना, सेवा, आदी चिकाटीने करतांना बघत आहे. आजीचा सर्वांत मोठा गुण ‘परिस्थिती स्वीकारणे’ हा आहे. जीवनात कशीही परिस्थिती आली, तरी तिने नेहमी शांत आणि मनाने स्थिर राहून परिस्थितीचा स्वीकार केला. तिचे शांत रहाणे, हा तिचा स्वभाव नाही, तर ती तिच्या साधनेची ओळख आहे. आजी नेहमी कोणतीही गोष्ट समजून घेते. समाजातील लोक तिच्याकडे आदर्श म्हणून पहातात. ती करत असलेली भक्ती अद्भुत आहे. ती केवळ माझी आजी नाही, तर माझ्यासाठी आदर्श आणि प्रेरणा आहे.
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
चैतन्य, आनंद आणि उत्साह देणारा मुंबई येथील श्री राजमातंगी महायज्ञ !
२९.४.२०२६ या दिवसापासून साधकाला स्वतःच्या आणि सेवेच्या संदर्भात जाणवत असलेले पालट !