९० सहस्रांची उपस्थिती, २ सहस्र ३०० चर्चचा सहभाग !

लिमा (पेरू) – येथे अमेरिकी ख्रिस्ती धर्मप्रचारक फ्रँकलिन ग्रॅहम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या एका मोठ्या ‘इव्हँजेलिकल’ कार्यक्रमात ९० सहस्रांहून अधिक लोक सहभागी झाले होते. यांमध्ये तब्बल १० सहस्र लोकांनी सार्वजनिकरित्या ख्रिस्ती धर्म स्वीकारला. यांपैकी बरेच जण १० ते २५ वर्षे वयोगटातील तरुण होते. ‘बिली ग्रॅहम इव्हँजेलिस्टिक असोसिएशन’ या ख्रिस्ती संस्थेने हा दावा केला आहे. संस्थेच्या संकेतस्थळावर या कार्यक्रमाची छायाचित्रे प्रसारित करण्यात आली आहेत. लिमा येथील ‘नॅशनल स्टेडियम’मध्ये आयोजित केलेल्या २ दिवसांच्या या मेळाव्यात तब्बल २ सहस्र ३०० चर्च सहभागी झाले होते. हे लोक मूळ कोणत्या धर्माचे होते, हे समजू शकलेले नाही.
🚨 10,000 Convert to Christianity in Lima, Peru
At a massive event with 90,000 attendees and participation of 2,300 churches, around 10,000 people reportedly converted.
After North America & Europe, Christian missionary networks are increasingly focusing on South America,… pic.twitter.com/O09Sn3Wy1W
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 10, 2026
संपादकीय भूमिकाउत्तर अमेरिका आणि युरोप यांनंतर ख्रिस्ती चर्च आता बळ, आमिष अन् कथित चमत्कार यांआधारे दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि आशिया खंड यांना लक्ष्य करत आहे. ही घटना त्याचेच द्योतक आहे. भारतातही अशा प्रकारे सहस्रावधी धर्मशिक्षणविहीन हिंदू ख्रिस्ती होऊ लागले, तर आश्चर्य नाही ! त्यामुळे याआधीच केंद्र सरकारने धर्मांतरविरोधी कायदा करणे आवश्यक ! |
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी भारताच्या दौर्यावर येणार !
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी
चीनने भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि आता बांगलादेश यांच्या बंदराद्वारे घेरले !
गोपालगंज जिल्ह्यातील एकाच हिंदु कुटुंबातील ४ जणांवर आक्रमण