|

(प्रतिकात्मक चित्र)
मुंबई, ९ मार्च (वार्ता.) – यापूर्वी केवळ कुंटणखान्याच्या बाहेर उभ्या रहाणार्या वेश्या आता ग्राहकांना हेरण्यासाठी मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी उघडपणे उभ्या राहू लागल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट, दादर, परळ, कांजूरमार्ग, मुलुंड, कल्याण यांसारख्या अन्य रेल्वेस्थानकांवर साधारणत: सायंकाळी ७ वाजल्यानंतर वेश्या उभ्या असतात. रेल्वेस्थानकांच्या व्यतिरिक्त मुंबईतील गर्दीच्या रस्त्यांवरही त्या आढळतात. हा प्रकार पोलीस-प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत खेदाचा आणि त्यापेक्षाही सामाजिक रचनेच्या दृष्टीने गंभीर आहे.
🚨 Are Public Places in Mumbai Turning into Prostitution Hubs?
Sex workers are reportedly standing at crowded areas and major railway stations – even on the bridge at Dadar Railway Station – openly scouting for customers.
Despite police presence nearby, little action is taken,… pic.twitter.com/I8hyqsll0s
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 9, 2026
नोकरवर्ग कामावरून सुटण्याच्या वेळेत गर्दीच्या ठिकाणी शृंगार करून या महिला उभ्या रहातात. दादर, परळ, ग्रँट रोड रेल्वेस्थानकांच्या बाहेरही रस्त्यांवर वेश्या आढळतात. अनेक वेळा आजूबाजूला पोलीस असूनही ते वेश्यांना हटकत नाहीत. त्यामुळे हे प्रकार पोलिसांना पैसे देऊन चालत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दादर रेल्वेस्थानकाच्या पुलावर उभ्या रहातात वेश्या !
दादर पूर्वेकडील कैलास मंदिर या दुकानापासून पश्चिमेकडे जाणार्या पुलावर ठराविक अंतरावर वेश्या उभ्या असतात. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्या आजूबाजूला काही पुरुष उभे असतात. पुलावरून जाणार्या नागरिकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न या महिला करतात. त्या ठिकाणी उभे असलेले रेल्वेचे पोलीसही त्यांना हटकत नाहीत. मागील काही दिवस नियमितपणे या पुलावरे वेश्या उभ्या रहात आहेत.
वेश्या ज्या भागात उभ्या रहातात, त्या परिसरातील काही हॉटेल्सच्या खोल्या वेश्यागमनासाठी निश्चित करून ठेवण्यात येत असल्याची शक्यता आहे. सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी वेश्या महिलांनी उभे राहून नागरिकांना आकर्षित करणे, हे प्रकार ढासळलेल्या सामाजिक स्थितीचे द्योतक आहे. असे प्रकार वेळीच रोखण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यांनी गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
संपादकीय भूमिकाउघडपणे चालणार्या चुकीच्या गोष्टी रोखू न शकणारे पोलीस आणि प्रशासन यांतील संबंधितांवरही सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे ! |
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
कोल्हापूर जिल्ह्यात ‘इन्स्टाग्राम’वरील ओळखीतून तरुणासमवेत पळून गेलेली १० वर्षांची मुलगी सापडली !
कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकर्यांना ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी’च्या निकषांपलीकडे जाऊन आर्थिक साहाय्य देणार
‘महा-एआय मॉडेल’द्वारे माहिती-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court