
प्रश्न : हिंदूंनी इतर धर्मियांप्रमाणे इतर धर्माच्या लोकांना आपल्या धर्मात आणण्याचे आटोकाट आणि सातत्याने प्रयत्न का केले नाहीत ?
उत्तर : श्रेष्ठ संस्कृतीच्या लोकांनी कनिष्ठ संस्कृतीच्या लोकांना आपल्यात सामावून घ्यायचे, म्हणजे आपली श्रेष्ठता, दर्जा (गुणवत्ता) निरंतर राखून त्यांना पचवून घेता आले पाहिजे. तसे सामावून घेता आले नाही, तर त्यांच्या संकरामुळे श्रेष्ठ संस्कृती कनिष्ठ पातळीला येते. आधी कनिष्ठ संस्कृतीच्या लोकांवर उच्च वर्गाच्या उन्नत गुणसंपत्तीचा प्रभाव पडला पाहिजे. त्यानंतर ‘आम्हीसुद्धा असे चांगले होऊ’, अशी भावना त्या कनिष्ठ संस्कृतीच्या लोकांमध्ये निर्माण झाली पाहिजे. मगच त्यांना आपल्या श्रेष्ठ संस्कृतीत सामावून घेता येईल. हीच गोष्ट हिंदूंच्या पूर्वजांनी कार्यवाहीत आणली. त्यांनी परकियांना आपल्या धर्मात जिरवून घेण्याची घाई केली नाही. त्यांनी आपली श्रेष्ठता कायम राखून इतर धर्माच्या लोकांना आपल्या सहवासात ठेवून कालांतराने आत्मसात करण्याची प्रक्रिया अनुसरली. विशिष्ट परिस्थितीत प्रायश्चित्त सांगून काहींना हिंदु धर्मात समाविष्ट करण्यात आले.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, ऑक्टोबर २०२२)
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !