रणरागिणींना उपस्थित रहाण्याचे आवाहन
जळगाव, ४ मार्च (वार्ता.) – हिंदु जनजागृती समिती प्रणित ‘रणरागिणी’ शाखेच्या वतीने येथे ‘नारी सामर्थ्याची नवी पहाट’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन ७ मार्च या दिवशी करण्यात आले आहे. महिलांनी स्वसंरक्षण आणि आपल्या संस्कृतीप्रती जागृत व्हावे, या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला जळगावमधील अधिकाधिक रणरागिणींनी उपस्थित रहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
🌸 ‘A New Dawn of Women’s Power’ Program in Jalgaon – March 7
Mayor Mrs. Deepmala Kale (@DeepmalaMKale) has been invited to grace the occasion.
Organised by Ranaragini, branch of @HinduJagrutiOrg, on the occasion of #WomensDay
Program Highlights:
⚔️ Expert guidance on various… pic.twitter.com/gGr0IRXO9J— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 4, 2026
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय सैन्यात देशसेवा बजावलेल्या मेजर मैत्रेयी दांडेकर (निवृत्त) आणि ‘आयर्नमॅन’ माहेश्वरी सरनोबत उपस्थित रहाणार आहेत. त्यांच्या अनुभवांतून जळगाव येथील महिलांना नक्कीच प्रेरणा मिळेल !
ही आहेत कार्यक्रमाची मुख्य आकर्षणे !
- महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन !
- स्वसंरक्षण कलेचे प्रत्यक्ष दर्शन !
- भारतीय शौर्यगाथा आणि संस्कृतीचा वारसा दर्शवणारे भव्य प्रदर्शन !
‘नारी सामर्थ्यांची नवी पहाट’ कार्यक्रम !दिनांक : ७ मार्च २०२६वेळ : सायंकाळी ५.३० ते ७स्थळ : बाकरे सभागृह, लुंकड कन्याशाळा, गणेश कॉलनी, जळगाव महिलांनी आपला हक्क आणि सामर्थ्य यांची ओळख करून घेण्यासाठी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा ! अधिक माहितीसाठी ९५५२४२६४३९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रणरागिणीच्या वतीने कु. सायली पाटील यांनी केले आहे. |


म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
मुलींमध्ये शौर्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण आवश्यक ! – प्रा. (सौ.) ज्योती वाघमारे, खासदार, शिवसेना
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रशासकपदी जिल्हाधिकार्यांची नियुक्ती !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !