
गंगापूर (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) – तालुक्यातील सिद्धपूर येथे श्रीराममंदिरासाठी दान दिलेल्या पवित्र जागेवर काही व्यक्तींनी अनधिकृत बांधकाम करून अतिक्रमण केले आहे. या विरोधात ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार दाद मागूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. (हिंदूच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणारा अतिक्रमण विभाग भ्रष्ट कि निष्क्रीय ? – संपादक) परिणामी मंदिराच्या जागेवरील अतिक्रमण हटवून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी २ मार्चपासून ‘आमरण उपोषण’ आरंभले आहे. या आंदोलनात ज्ञानेश्वर यादव, दीपक घोडके, काकासाहेब जाधव, विलास जाधव आणि नामदेव सांगळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.
प्रशासनाच्या ढीम्म कारभारामुळे संताप !
ग्रामस्थांनी या संदर्भात २७ फेब्रुवारी या दिवशी तहसीलदारांना निवेदन दिले होते. यात स्पष्ट करण्यात आले आहे की, संबंधित व्यक्तीने स्वतःच्या जागेव्यतिरिक्त लगतच्या ‘मिळकत क्रमांक ३२’ या राममंदिराच्या नियोजित जागेवर ग्रामपंचायतीची कोणतीही अनुमती न घेता अवैध बांधकाम चालू केले आहे. मंदिराच्या कार्यासाठी आणलेल्या विटांचा वापरही हे लोक स्वतःच्या अनधिकृत बांधकामासाठी करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
गुन्हा नोंद होऊनही कारवाईचा अभाव !
या गंभीर प्रकाराविषयी २३ फेब्रुवारी या दिवशी गंगापूर पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तीवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. असे असूनही हे अनधिकृत बांधकाम अविरत चालूच आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे सिद्धपूरमधील ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ‘जोपर्यंत मंदिराच्या जागेवरील अतिक्रमण हटवले जात नाही आणि दोषींवर कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत हे उपोषण मागे घेणार नाही’, असा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित