माझा जन्म जर्मनीतील लोकशाहीत झाला होता. ‘लोकशाही हा नक्कीच सरकारचा सर्वोत्तम प्रकार आहे’, असे मी लहानपणापासून ऐकले होते. ‘लोकांचे, लोकांद्वारे, लोकांसाठी’ असलेले सरकार आम्हाला यापेक्षा अधिक काय हवे ? सुदैवाने जेव्हा जेव्हा लोकशाही धोक्यात असते आणि ती आपल्याला वाचवण्याची किंवा इराक, सायरा, लिबिया यांसारख्या इतर देशांमध्येही लोकशाहीची देणगी आणण्याची आवश्यकता असते. काही आठवड्यांपूर्वी, ‘वितास्ता पब्लिशिंग’च्या संस्थापकांनी मला अमेरिकेतील समाजशास्त्रज्ञ आणि लेखक साल्वाटोर बाबोन्स यांच्या ‘डेमोक्रेसी विथ धर्म’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी उपस्थित रहाण्यास सांगितले. पहिल्यांदाच मी लोकशाहीवर खोलवर विचार करून अनपेक्षित निष्कर्षापर्यंत पोचले.

१. लोकशाही देश असलेल्या भारताची साल्वाटोर बाबोन्स यांनी केलेली प्रशंसा !
साल्वाटोर बाबोन्स यांनी युक्तीवाद केला होता की, भारतीय लोकशाही ही सदोष म्हणून मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय निरीक्षक तिच्याकडे तुच्छतेने पहातात; परंतु प्रत्यक्षात भारत देश हा लोकशाहीच्या निकषांत चांगल्या प्रकारे जुळतो. रशिया किंवा चीन यांच्याप्रमाणे लोकशाही देशांच्या समूहामध्ये भारताला उद्देशून ‘ती एक चांगली मुलगी आहे’, याविषयी त्यांनी भारताचे कौतुक केले. भारतीय लोकशाहीमध्ये धर्माची भूमिका असल्याचीही संकल्पना त्यांनी मांडली.
२. लोकशाहीपेक्षा धर्म महत्त्वाचा मानणारा समाजच चांगला !

माझा पहिला निष्कर्ष असा होता की, कोणत्याही समाजासाठी ‘धर्म’ हा लोकशाहीपेक्षा अधिक महत्त्वाचा असतो. जर समाज आणि त्याचे नेते धर्मपालन करत असतील, तर तो चांगला समाज आहे. जर त्यांनी धर्माचे पालन केले नाही, तर तो समाज वाईट आहे. सुदैवाने भारतियांना धार्मिक जीवनशैलीपासून दूर नेण्याचे विविध प्रयत्न करूनही किमान पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतात अजूनही मोठ्या प्रमाणात धर्मपालन केले जाते.
३. राष्ट्रामध्ये एकजूट साधण्याविषयी व्यवस्थेचे अपयश !
लोकशाही म्हणजे सहकार्याऐवजी सतत संघर्ष करणे होय. आम्हाला सांगण्यात आले आहे की, निरोगी लोकशाहीसाठी मजबूत विरोधी पक्षाची आवश्यकता असते. भक्कम विरोध म्हणजे जवळजवळ निम्म्या मतदारांनी सत्ताधारी पक्षाला मतदान केले नाही आणि ते सरकारविषयी अप्रसन्न होते. याहून वाईट गोष्ट म्हणजे विरोधी नेत्यांना पुढील निवडणूक जिंकण्याची संधी मिळण्यासाठी त्यांच्या मतदारांना सरकारविषयी नाखूष ठेवणे आणि सरकारला मतदान करणार्यांपैकी काहींनाही नाखूष करणे यांची आवश्यकता आहे. त्यामुळे राष्ट्रामध्ये एकजूट करण्यापेक्षा निरोगी लोकशाही आणण्यासाठी व्यवस्था अपयशी ठरत आहे.
४. लोकशाहीत निवडणुका जिंकण्यासाठी पैसे महत्त्वाचे !

पैसा यात मोठी भूमिका बजावतो. निवडणुका महागड्या असतात. यातील बहुतांश पैसे मोठ्या देणगीदारांकडून येतात. देणगीदारांना साहाय्याची अपेक्षा असते. सहसा त्यांना त्यांनी केलेल्या गुंतवणुकीपेक्षा अधिक परतावा हवा असतो. त्यामुळे अगदी प्रामाणिक नेत्यावरही हा दयाळूपणा परत करण्यासाठी दबाव येतो. परिणाम सार्वजनिक हितापेक्षा खासगी हितांकडे निर्णय वळू शकतात.
५. लोकशाहीत नेत्यांना विकत घेतले जाते !
लोकशाहीमध्ये बहुतांश वेळा नेते क्वचितच नैतिक आदर्शवत् असतात. ते दबावगटाचे प्रतिनिधी किंवा रहस्ये आणि प्रलोभने यांनीच वेढलेले असतात. यामुळे ते असुरक्षित होतात.
राजकारण्यांना कसे फसवले किंवा विकत घेतले जाऊ शकते आणि लोकशाहीला एक विनोद कसे बनवले जाऊ शकते, हे ‘जेफ्री एपस्टीन’च्या ‘फाइल्स’ने उघड केले आहे.
(‘एपस्टीन फाइल्स’ म्हणजे अमेरिकेत धनाढ्य गुन्हेगार कशा प्रकारे अल्पवयीन मुली, महिला यांच्या लैंगिक शोषणाची यंत्रणा निर्माण करतो ? त्यांची तस्करी करतांना लोकप्रतिनिधी, श्रीमंत उद्योगपती, समाजातील प्रतिष्ठित यांना सहभागी करून घेतो, मुलींना लैंगिक गुलाम बनवून त्यांची तस्करी करतो’, ही सर्व भयावह स्थिती ‘एपस्टीन फाइल्स’च्या माध्यमातून अमेरिकी सरकारने उघड केली आहे.)
रामराज्य आणि राजधर्म यांचे महत्त्व

महाभारतामध्ये भीष्म युधिष्ठिराला राजधर्म समजावून सांगतो. महाभारत ‘देशावर राज्य कसे करावे ?’ याचा उत्कृष्ट सल्ला देते. आधुनिक लोकशाहीपेक्षा ‘रामराज्य’ उच्च स्थानावर आहे. राम हा धार्मिक आणि स्वतंत्र शासक होता. ज्याच्याकडे विश्वासार्ह आणि बुद्धीमान सल्लागार आहेत, तो स्वतःच्या कल्याणापेक्षा आपल्या लोकांची सुरक्षा अन् कल्याण यांना प्राधान्य देतो. भीष्म आणखी एक महत्त्वाचा सल्ला देतो, तो म्हणजे राजाने देवांची पूजा करणे आवश्यक आहे.
६. देशासाठी सर्वाेत्तम न निवडता निवडणूक कोण जिंकणार, यावरून धोरण ठरवले जाणे !
सरकारची धोरणे अनुक्रमे चांगली किंवा वाईट आहेत, हे मतदारांना पटवून देण्यासाठी आणि सरकारला आणखी कार्यकाळ देण्यासाठी किंवा त्यात पालट करण्यासाठी प्रचंड प्रमाणात ऊर्जा अन् पैसा वाया जातो. धर्म, भाषा, प्रदेश किंवा वर्ग यांवर आधारित काही गटांना त्यांच्या मतांमुळे सवलती देण्याचे आश्वासन दिले जाते. देशासाठी सर्वोत्तम काय आहे, यावरून नव्हे, तर पुढील निवडणूक कोण जिंकेल, यावरून धोरणे ठरवली जातात. स्वाभाविकच संख्येच्या दृष्टीने लहान गटांकडे दुर्लक्ष होते; कारण त्यांचा पाठिंबा गमावल्याने काही फरक पडणार नसतो. परिणामी समाजात नैराश्य येते. कुणावरही अन्याय होणे चांगले नाही.
७. लोकशाही देशातील अनेक नागरिक राजकारण आणि मतदान यांपासून दूर !

अनेक नागरिकांना राजकारणात रस नसतो. अमेरिका किंवा भारत यांसारख्या लोकशाही देशांत बरेच लोक मतदानच करत नाहीत. मतदारांपैकी मतदान करणारी प्रत्येक तिसरी व्यक्ती तिचे मित्र किंवा नातेवाईक यांच्या विचारांनी प्रभावित होते.
८. लोकांचा आवाज किंवा मते यांवर माध्यमसंस्थाचाच प्रभाव
माध्यमसंस्था काय ठळक करायचे आणि काय लपवायचे, हे निवडून मते सिद्ध करतात. तरीही त्या निवडीसाठी स्वतंत्र आहेत कि प्रसारमाध्यमांचे मालक त्यांना निर्देश देतात ? हे पहायला हवे. त्यामुळे व्यवहारामध्ये लोकांचा आवाज मोठ्या प्रमाणात नियोजित केला जातो. हे सर्व कुणाच्या लाभासाठी, याचाही विचार व्हायला हवा.
९. लोकशाहीमध्ये नेत्यांना कठोर पावले उचलण्याविषयी असलेली मर्यादा !
लोकशाहीत बर्याचदा नेत्यांना कठोर पावले उचलण्यात मर्यादा येते; परंतु दीर्घकाळासाठी अनुदानात कपात करणे किंवा आरक्षण काढून टाकणे यांसारखी चांगली पावलेही नेत्यांकडून उचलली जातात; कारण त्यांना पुढील निवडणूक गमावण्याची भीती वाटते. जर एखादा नेता कठोर पावले उचलण्याचे धाडस करत असेल, तर त्याचे निर्णय न्यायालये, निदर्शने आणि समित्या यांच्यातच अडकून पडतात. संकटाच्या वेळी हा विलंब महागडा ठरू शकतो.
१०. दोन महायुद्धे आणि जगातील सत्तेच्या संरचनेत झालेले पालट
मला आणखी एक विचित्र; पण महत्त्वाचे सूत्र लक्षात आले. पहिल्या महायुद्धाच्या आधी बहुतेक देशांमध्ये राजेशाही होती. रशियातील बोल्शेविक क्रांतीच्या वेळी झार आणि त्याच्या कुटुंबाची क्रूर हत्या ही लोकशाही प्रजासत्ताकांच्या बाजूने जगभरातील राजेशाही रहित करण्याचा प्रारंभ होता. जर्मन सम्राटाला वर्ष १९१८ मध्ये पदत्याग करण्यास भाग पाडले गेले. आता वर्ष २०२६ मध्ये, गुगलच्या मते, सौदी अरेबिया, ओमान किंवा ब्रुनेई यांसारख्या केवळ ७ खर्या राजेशाही अस्तित्वात आहेत.
अल्पावधीतच संपूर्ण जगाने राजांपासून त्यांची सत्ता हिरावून घेतली आणि त्यांच्या शतकानुशतके जुन्या अन् कालसिद्ध शासन व्यवस्थेपासून मुक्तता मिळवली, हे कसे शक्य आहे ? काही देशांनी राजा किंवा राणी यांना प्रमुख व्यक्तीमत्त्व म्हणून ठेवले. इतरांनी मात्र त्यांना पूर्णपणे पदच्युत केले. जगातील सत्तेच्या संरचनेच्या अगदी शीर्षस्थानी असलेल्यांनी कदाचित दोन महायुद्धांच्या साहाय्याने हे घडवले असावे !
११. मानवतेवर नियंत्रण आणण्यासाठी जगातील राष्ट्रांवर लोकशाही लादली गेली असण्याची शक्यता
लोकशाही ही जगातील राष्ट्रांवर लादली गेली होती का ? असा प्रश्न येतो; कारण नव्याने निवडून आलेल्या, अननुभवी नेत्यांना भ्रष्ट करणे आणि धमक्या देणे हे भ्रष्ट अन् स्थापित राजेशाहीला धमक्या देण्यापेक्षा सोपे असावे; कारण नागरिकांमध्ये फूट पाडणे, त्यांना एकमेकांशी लढायला लावण्ो आणि अगदी वरच्या स्तरावरील लोकांकडे न पहाता संपूर्ण मानवतेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला दिसतो. जाणूनबुजून खोट्या बातम्या आणि दंगली यांद्वारे कार्यकर्त्यांना पैसे देऊन उजव्या आणि डाव्या, तसेच जाती, वांशिक अन् धर्म यांमधील फूट वाढवली जात आहे का ? केंद्रीय गुप्तचर संस्थेने (सी.आय.ए.ने) इसिस आणि अल्-कायदा यांनाही पाठिंबा दिला नाही का ?
१२. समाजातील शक्तीशाली पुरुषांकडून होणार्या घृणास्पद कृती
हे अविश्वसनीय आहे; परंतु पिरॅमिडच्या (शंकूकृती मनोरा) शीर्षस्थानी असलेले शक्तीशाली पुरुषही घृणास्पद विधी करतात. त्यापैकी सर्वांत वाईट म्हणजे सैतानी शक्तींना संतुष्ट करण्यासाठी मुलांचा छळ करणे आणि त्यांची हत्या करणे आदी प्रकार केले जातात. ते अंधःकारमय जग आहे. भारतीय पुराणांनुसार, हा कालीपुरुषाचा नियम आहे, ज्यामध्ये धर्म केवळ एका पायावर झुकलेला असतो.
१३. उच्चभ्रू लोकांचे काळे डावपेच जनतेसमोर आणण्यात ‘एपस्टीन फाइल्स’ची महत्त्वपूर्ण भूमिका
यापूर्वी कधीही इतके काळे डावपेच उघडकीस आले नव्हते; पण ते आता येत आहेत, हा सकारात्मक पालट आहे. तथाकथित उच्चभ्रू लोक काय करतात, हे सामान्य लोकांना यापूर्वी कधीही कळले नव्हते. ‘एपस्टीन फाइल्स’ यामध्ये मोठी भूमिका बजावते. जे समोर येते, त्यात आपल्याला स्वारस्य असले पाहिजे आणि ते गांभीर्याने घेतले पाहिजे. विशेषतः परदेशी आक्रमणकर्त्यांच्या चांगल्या शब्दांवर विश्वास ठेवणे ही गेल्या शतकातील चूक भारतियांनी पुन्हा करू नये; कारण त्या शब्दांमागील हेतू द्वेषपूर्ण होते आणि त्यांच्या पद्धतीही सैतानी होत्या.
१४. धर्मनिष्ठ नेतृत्व आणि प्रभावशाली व्यक्तींचे राजकारण
धर्मामुळेच भारत अजूनही जगात तुलनेने उज्ज्वल स्थानी आहे. ‘विकिलीक्स’ने खुलासा केला होता की, पंतप्रधान मोदी भ्रष्टाचारी नाहीत. ते अत्यंत प्रामाणिक आहेत. असे असले, तरीही ज्यांचा सरकारमधील धोरणांवर प्रभाव आहे, अशा सर्व शक्तीशाली व्यक्ती धर्माचे पालन करतात किंवा त्यांना फसवले जाऊ शकत नाही, याची हमी देता येत नाही. प्रभावशाली व्यक्तींशी तडजोड करण्याचे प्रयत्न नक्कीच चालू आहेत.
१५. अतुलनीय संपत्तीच्या बदल्यात मानवी बळींचा आरोप
धर्मनिरपेक्ष लोकशाहीत स्पष्टपणे देवतांसाठी स्थान नाही. विज्ञानाचा उद्देश धर्माची जागा घेणे हा आहे. सामान्य लोकांनी केवळ भौतिक क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि आपल्या दैवी परंपरा विसरल्या पाहिजेत. प्रसिद्ध इस्रायली इतिहासकार आणि जागतिक आर्थिक मंचामधील नियमित सहभागी युवल नोहा हरारी याची इच्छा आहे की, आपण देवावरील विश्वासाला हास्यास्पद मानले पाहिजे. तरीही ‘आपले अधिपती (जागतिक आर्थिक गट) अदृष्य क्षेत्राला अतिशय गांभीर्याने घेत असून अतुलनीय संपत्ती आणि सत्ता मिळवण्यासाठी दुष्प्रवृत्तींचे शक्तींचे साहाय्य घेत आहेत’, असे दिसते. विशेषतः लैंगिक शोषण आणि सैतानी बलीदान यांच्यासाठी केल्या जाणार्या मुलांच्या तस्करीविरोधात आवाज उठवणारे अनेकजण आहेत. त्यापैकी अनेकांनी तोंड उघडल्यानंतर ते लगेचच रहस्यमय परिस्थितीत मृत पावले; पण डच रोनाल्ड बर्नार्ड यांसारखे काहीजण सुदैवाने अजूनही जिवंत आहेत. बर्नार्ड उच्च वित्तीय मालमत्ता व्यवस्थापनामध्ये आला; कारण त्याला त्याचा विवेक लपवण्यामध्ये कोणतीही अडचण नव्हती. अधिकाधिक पैसे कमावणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट होते. तो म्हणाला, ‘‘मी मौजमजेसाठी सैतानी विधींना उपस्थित राहिलो आणि उपस्थित नग्न महिलांनी माझे मनोरंजन केले.’’ जेव्हा त्याला उन्नतीकरणासाठी आमंत्रित करण्यात आले, तेव्हा त्याच्यासाठी निर्णायक क्षण आला. जर त्याने मुलांचे बळी दिले, तर त्याला अकल्पनीय संपत्तीचे वचन देण्यात आले होते. त्यामुळे हाच त्याच्यासाठी निर्णायक टप्पा होता.
– मारिया विर्थ, हिंदु धर्म अभ्यासिका, उत्तराखंड
संपादकीय भूमिकाभारतात धार्मिक जीवनशैली अस्तित्त्वात असल्यानेच समाजव्यवस्था टिकून आहे ! |
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !